आंदोलन
…’ती’ वादग्रस्त कंपनी पुन्हा सुरू करण्याची परवानगी देऊ नका-शेतकरी संघटना

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमाभागात असलेल्या व भूजल प्रदूषणामुळे जवळचे सुमारे त्रस्त नांदेसर,बदापूर,नाटेगाव,येसगाव,अंचलगाव,खिर्डी गणेश,पिंपळगाव जलाल आदी सात गावांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या कृष्णा एन्झायटेक प्रा.लि.हि कंपनी पुन्हा सुरू करण्यास नाशिक येथील विभागीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी देऊ नये अशी मागणी या भागातील बाधित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा केली आहे.त्यामुळे येवला आणि कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

“कृष्णा एन्झायटेक प्रा.लि.कंपनीचा वीजपुरवठा जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांनी खंडित केला आहे.सदर कंपनीच्या कामकाजाबाबत तसेच त्याचा आजूबाजूच्या गावांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य भूजल परिणामाबाबत स्थानिक शेतकरी व रहिवाशांच्या चिंता लक्षात घेता,कंपनीला पुन्हा कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी कंपनीने आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक परवानग्या,संमतीपत्रे,पर्यावरणीय मंजुरी,ग्रामपंचायतींच्या (स्थानिक प्राधिकरणांच्या) परवानग्या तसेच इतर लागू असलेल्या कायदेशीर बाबींचे अनुपालन पूर्ण केले आहे किंवा नाही,याची प्रदूषण मंडळाच्या मार्फत पडताळणी करण्यात यावी”-शेतकरी संघटना,कोपरगाव तालुका.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नांदेसरसह,नाटेगाव,बदापूर आदी सहा गावातील भूजल प्रदूषित करून कृषीक्षेत्र उध्वस्त करणाऱ्या मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेती क्षेत्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे अहवाल मागील महिन्यात प्राप्त झाले होते.सदरचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित असल्याचे उघड झाल्याने या सात गावातील शेतकरी संघटनेने,” सदर कंपनी बंद करावी” अशी मागणी केली होती.त्या मागणीला यश येऊन नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन उपक्रम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले होते.तसे न केल्यास,जल अधिनियम १९७४ आणि हवा अधिनियम १९८१ च्या तरतुदींनुसार तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मंडळाकडे कोणताही पर्याय राहणार नाही” अशी सक्त ताकीद प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली होती.त्यात महावितरण कंपनीने सदर विद्युत जोडणी खंडित केली होती.त्यामुळे सदर कंपनीचे धाबे दणाणले होते.त्यानंतर यांनी पुन्हा नव्या जोमाने सदर कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांनी आपला महावितरण कंपनीच्या वतीने आपला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला असल्याची माहिती हाती आली आहे.कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी आदींनी हा जल्लोष फटाके उडवून साजरा केला असून त्याचे चलचित्रण (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर अपलोड केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.तसे चलचित्रण आमच्या प्रतिनिधींचे हाती आले आहे.त्यामुळे संबंधित सात गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व याबाबत नाशिक येथील विभागीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीस अशी कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कृष्णा एन्झायटेक प्रा.लि.कंपनीचा वीजपुरवठा जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांनी खंडित केला आहे.सदर कंपनीच्या कामकाजाबाबत तसेच त्याचा आजूबाजूच्या गावांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य भूजल परिणामाबाबत स्थानिक शेतकरी व रहिवाशांच्या चिंता लक्षात घेता,कंपनीला पुन्हा कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी कंपनीने आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक परवानग्या,संमतीपत्रे,पर्यावरणीय मंजुरी,ग्रामपंचायतींच्या (स्थानिक प्राधिकरणांच्या) परवानग्या तसेच इतर लागू असलेल्या कायदेशीर बाबींचे अनुपालन पूर्ण केले आहे किंवा नाही,याची प्रदूषण मंडळाच्या मार्फत पडताळणी करण्यात यावी.त्याचे प्रदूषण मंडळाचे इतर सक्षम प्राधिकरणांनी लागू केलेल्या सर्व आवश्यक अटी व निर्देशांचे पूर्णपणे पालन होईपर्यंत कंपनीला पुन्हा कामकाज सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.त्यामुळे आता प्रदूषण मंडळ काय भूमिका घेणार याकडे नांदेसर,बदापूर,नाटेगाव,येसगाव,अंचलगाव,खिर्डी गणेश,पिंपळगाव जलाल आदी सात गावांतील शेतकऱ्यांचे लागले आहे.



