गुन्हे विषयक
पोलिसांनी वाळूचोराविरुद्ध मोठी कारवाई,13 लाखांचा अवैज जप्त ?

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत गोदावरी नदीतील अवैध वाळू उपसा महसूल आणि पोलिस प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली असताना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी हा प्रश्न चांगलाच गंभीरपणे घेतला असल्याचे दिसून येत असून त्यांनी गत दोन दिवसांत केलेल्या कारवाईत जवळपास वाळू चोरांचा 13 लाख रुपयांचा ऐवज जप्त करत कुंभारी येथील आरोपी निहाल राजु शेख व नितीन राजेंद्र कदम या दोघांवर तर धारणगाव येथील कारवाईत कोपरगाव निंबारा येथील आरोपी आकाश संजय तुपसुंदर अशा तिघांवर गुन्हे दाखल केल्याने वाळूचोरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात वाळूचोर इतके मुजोर बनले आहे की त्यांना आता पोलिसांची आणि कोणाची भीती वाटत असल्याचे दिसून येत नाही.त्याला कारण मागील काळात मिळालेले राजकीय अभय असल्याचे दिसून येत आहे.मागील भाजप आमदाराचे काळात आपल्या सहकाऱ्यांचे नावावर वाळू उपसा कारणाचे ठेके घेतले असल्याचे उघड झाले होते.त्यात नेत्याचा सहभाग असल्याची बाब लपून राहिलेली नाही.त्यामुळे वाळू चोऱ्याविरुद्ध मोर्चे काढणाऱ्या नेत्यांची पुढची पिढी वाळूत सक्रिय झाली ही राजकीय विचार श्रेणीचा ऱ्हास दाखवणारी घटना घडली होती.
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीसह विविध परिसरामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून ही वाळूचोरी प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोपरगाव तालुक्यातील धारणगाव,डाऊच,सांगवी भुसार,सुरेगाव,मोर्विस व इतर नदीकाठच्या शिवारांमधून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा केला जातो.स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी छापे टाकून ट्रॅक्टर,ट्रक यांसारखे वाहने व मुद्देमाल जप्त करण्यात येतो.बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर गुन्हे दाखल करूनही वाळूचोरीचे प्रमाण पूर्णपणे थांबलेले नाही.वाळूचोर इतके मुजोर बनले आहे की त्यांना आता पोलिसांची आणि कोणाची भीती वाटत असल्याचे दिसून येत नाही.त्याला कारण मागील काळात मिळालेले राजकीय अभय असल्याचे दिसून येत आहे.मागील भाजप आमदाराचे काळात आपल्या सहकाऱ्यांचे नावावर वाळू उपसा कारणाचे ठेके घेतले असल्याचे उघड झाले होते.त्यात नेत्याचा सहभाग असल्याची बाब लपून राहिलेली नाही.त्यामुळे वाळू चोऱ्याविरुद्ध मोर्चे काढणाऱ्या नेत्यांची पुढची पिढी वाळूत सक्रिय झाली ही राजकीय विचार श्रेणीचा ऱ्हास दाखवणारी घटना घडली होती.दोन दशकापूर्वी माजी खा.शंकरराव काळे यांनी उच्च न्यायालयात जाऊन वाळू उपसा बंद केला होता.मात्र त्यावेळी वाळूचोरांच्या लीला थांबल्या नव्हत्या.शेवटी महसूल विभागाचा महसूल बुडू नये म्हणून त्यातून माजी खा.स्व.काळे यांनी सपशेल आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दाखल केलेली याचिका माघार घेतली होती.त्यानंतर वाळूचोरानी आपल्या चौर्यलीला कमी केल्या नाहीत.अनेक वाळूचोरांनी तहसीलदार,कारकून,अनेक तलाठी आदींना आपले प्रताप दाखवून त्यांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकवून घरचा रस्ता दाखवला असल्याचे दिसून आले आहे.काहींनी तर थेट तहसीलदारांच्या किचनमध्ये चोरट्या मार्गाने प्रवेश करून त्यांना तोंड काळे करून जाण्यास भाग पाडले असल्याचे दिसून आले ही बाब लपून राहिली नाही.त्यामुळे आता नव्याने हजर झालेले पोलिस अधिकारी संभाजी गायकवाड हे गंभीर आणि कामावर विशेष प्रेम करणारे अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे.त्यामुळे आता वाळूचोर त्यांना किती गांभीर्याने घेणार याकडे तालुक्याचे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

दोन दशकापूर्वी माजी खा.शंकरराव काळे यांनी उच्च न्यायालयात जाऊन वाळू उपसा बंद केला होता.मात्र त्यावेळी वाळूचोरांच्या लीला थांबल्या नव्हत्या.शेवटी महसूल विभागाचा महसूल बुडू नये म्हणून त्यातून माजी खा.स्व.काळे यांनी सपशेल आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दाखल केलेली याचिका माघार घेतली होती.त्यानंतर वाळूचोरानी आपल्या चौर्यलीला कमी केल्या नाहीत.अनेक वाळूचोरांनी तहसीलदार,कारकून,अनेक तलाठी आदींना आपले प्रताप दाखवून त्यांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकवून घरचा रस्ता दाखवला असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसात पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केलेल्या कारवाईत गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणारे विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे कारवाईत निहाल राजु शेख व नितीन राजेंद्र कदम या दोन आरोपींकडून दोन ट्रॅक्टर आणि केणी सह 8 लाख रुपयांचा मुददेमाल जप्त केला असल्याचे उघड झाले आहे.सदर आरोपी गोदावरी नदीचे पात्रात ट्रॅक्टर व केणी तथा फरांडीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले होते.त्यावेळी पोलिस पथकाने त्यांचेवर छापा टाकला असता त्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत धारणगाव येथील गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करणारे विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथकाने कारवाई करून त्यांचेकडून ट्रॅक्टर केनीसह 05 लाख रुपयांना मुद्देमाल जप्त केला आहे.त्यात आकाश संजय तुपसुंदर रा.लिंभारा मैदान,कोपरगाव हा असल्याचे उघड झाले आहे.त्याने पोलिसांचा सुगावा लागला असता घटनास्थळावरून पोबारा केला आहे.त्या बाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी गोघांवर स्वतंत्र कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
दरम्यान ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे पथकातील पो.ना. रघुनाथ कारखेले,पो.कॉन्स्टेबल अंबादास वाघ,जयदिप गवारे,राम खारतोडे व चालक अनिल फाळके,नवनाथ जाधव आदींनी महत्वाची भूमिका वठवली आहे.दरम्यान पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे कनिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.



