गुन्हे विषयक
महाविद्यालयीन तरुणांत हाणामारी,दोघांवर गुन्हा !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्रवेशद्वाराचे समोर महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात नुकतीच मारहाण होऊन त्यात रोहित अशोक भालेराव (वय-17) रा. सावळीविहीर हा गंभीररीत्या जखमी झाला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यात आरोपी म्हणून श्रेयस राहुल जगताप रा.सावळीविहीर तर दुसरा साहिल सुपेकर या मोहिनीराजनगर या दोघांचे नाव असल्याचे उघड झाले.त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालिकांत खळबळ उडाली आहे.

महाविद्यालयात आजकाल किरकोळ कारणांवरून होणारे वाद,सोशल मीडियावरील वैर आणि वर्चस्व गाजवण्याची वृत्ती यांमुळे महाविद्यालयीन आवारात किंवा बाहेर हाणामारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.यात रील,स्टेटस किंवा कमेंट्सच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान देणे किंवा चिडवणे यातून अनेकदा मोठे वाद निर्माण होतात.वादाला कारण म्हणजे अभ्यासाचा ताण आणि वैयक्तिक आयुष्यातील नैराश्यामुळे तरुणांमध्ये संयम कमी होत असून आक्रमकता वाढत आहे.या शिवाय ड्रग्ज,दारू किंवा इतर अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्यामुळे या गुन्ह्यात वाढ होताना दिसून येत असून पालकांनी यात लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढणाऱ्या मारहाणीच्या आणि हिंसेच्या घटना ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.आजकाल किरकोळ कारणांवरून होणारे वाद,सोशल मीडियावरील वैर आणि वर्चस्व गाजवण्याची वृत्ती यांमुळे महाविद्यालयीन आवारात किंवा बाहेर हाणामारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.यात रील,स्टेटस किंवा कमेंट्सच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान देणे किंवा चिडवणे यातून अनेकदा मोठे वाद निर्माण होतात.वादाला कारण म्हणजे अभ्यासाचा ताण,करिअरची चिंता आणि वैयक्तिक आयुष्यातील नैराश्यामुळे तरुणांमध्ये संयम कमी होत असून आक्रमकता वाढत आहे.या शिवाय ड्रग्ज,दारू किंवा इतर अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्यामुळे तरुण स्वतःवरील नियंत्रण गमावून बसल्याची अनेक उदाहरणे अलीकडील आढळून येत आहे.मात्र कोपरगाव शहरात घडलेल्या घटनेचे कारण पोलिसांनी मागील भांडणाचे दिले आहे.मात्र त्याचा उल्लेख केला नाही.मात्र यातील आरोपी श्रेयस राहुल जगताप रा.सावळीविहीर तर दुसरा साहिल सुपेकर यांनी मागील भांडणाचे कारणावरून ही हाणामारी केली असल्याचे म्हटले आहे.यात आरोपींनी आपल्या हातातील कड्याचा वापर केला असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे फिर्यादी तरुण रोहित भालेराव हा गंभीररीत्या जखमी झाला असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 524/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1),115(2),352 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दिपक रोकडे हे करीत आहेत.



