आरोग्य
कोपरगावात कोरोना लाटेचा आलेख खाली
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३७५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०३ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८७ हजार ३०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ४९ हजार २०८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.१७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ०७३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५६ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६४ हजार ९५० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ९८७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५५ हजार ६६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ३०० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याच्या तयारीत दिसत आहे.वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून तोश्री लाट निर्माण होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.त्यापासून नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे.