जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिर्डी संस्थांच्या अध्यक्षपदी आ.आशुतोष काळेंची नियुक्ती !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार या बाबत गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढ्यानंतर तर्कवितर्क सुरु असताना आज कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे असल्याची माहिती उपलब्ध झाली असली तरी याबाबत अधिकृत माहिती अजून उपलब्ध नासल्याची माहिती औरंगाबाद खंड पीठातील वकील अजिंक्य काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान आज याबाबत शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता.मात्र आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

साई संस्थांच्या अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.काळे यांचे नाव नक्की झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस विश्वसनीय सूत्रांकडून आज दुपारीच मिळाली असून अकरा विश्वस्तांची निवड झालीआहे बाकी विषवस्त आगामी काळात निश्चित करण्यात येणार आहे.यात कोपरगाव शिर्डी,राहुरी श्रीरामपूर येथील राष्ट्रवादी व काँग्रेस सेनेतील मधील चार विश्वस्त अजून सामील होणार असल्याची माहिती आहे.दरम्यान औरंगाबाद खण्डपीठात उद्या सुनावणी ठेवण्यात आली असून आज अशी अधिकृत यादी आली नसल्याची माहिती अड्.अजिंक्य काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक आज मुंबईत पार पडली आहे.देशविदेशातील साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून प्रयत्न सुरु होते.अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद,अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे.

महामंडळांच्या नियुक्त्या पंधरा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत.तिन्ही पक्षांना समसमाना वाटप आणि अपक्षांनाही हिस्सा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असल्याची बातमी आहे.तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक झाली.आज संपन्न झालेल्या बैठकीत काही महामंडळांचे वाटप झालं आहे.अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. तिन्ही पक्षांकडे महामंडळे असतील.आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ ठरवले जातील,आघाडीत विसंवाद नसल्याचा दावा महाआघाडीकडून करण्यात येत आहे.मात्र साई संस्थांच्या अध्यक्षपदी मात्र कोपरगावचे आ.काळे यांचे तर विश्वस्तपदी संदीप वर्पे,संग्राम कोते,अनुराधा आदिक,अजित कदम, पांडुरंग अभंग, हे विश्वस्त राहणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून अकरा विश्वस्तांची माहिती आहे बाकी विषवस्त आगामी काळात निश्चित करण्यात येणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close