जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

माजी आमदार कै.के.बी रोहमारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २४ ते २६ जानेवारी रोजी के.जे.सोमैया महाविद्यालय,कोपरगाव येथे राज्यस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून ही स्पर्धा सहा गटासाठी घेण्यात येणार आहे.यात १५ व १९ वर्षाखाली मुले व मुली सिंगल्स,महिला डबल्स,मिक्स डबल्स,पुरुष डबल्स व ३५ वर्षावरील पुरुष डबल्स गटासाठी असून ही बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


            

“स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोपरगावातील सर्व बॅडमिंटन प्रेमी प्रयत्नशील असून इच्छुक स्पर्धकांनी डॉ.सुनील कुटे-९६०४०४०३८३,सागर रोडे-९४०३९६९९६४ यांच्याशी संपर्क साधावा”- संदीप रोहमारे,कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन.

   दरम्यान ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पीयू सिंथेटिक कोर्टवर कळविण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी राज्यभरातून अंदाज ८० संघ सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.या स्पर्धेसाठी ०१ लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.तसेच बेस्ट प्लेयर महिला व पुरुष असेही इतर पारितोषिक देण्यात येणार आहे.

          सदर स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना लि.गौतमनगर हे असणार आहे.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोपरगावातील सर्व बॅडमिंटन प्रेमी प्रयत्नशील आहे.इच्छुक स्पर्धकांनी डॉ.सुनील कुटे-९६०४०४०३८३,सागर रोडे-९४०३९६९९६४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप रोहमारे व के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय सी.ठाणगे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close