शैक्षणिक
…या इंटरनॅशनल स्कूलमध्ये कला प्रदर्शन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन करून योगाभ्यासाचे प्रसिद्ध प्रशिक्षक दत्तात्रय पुंडे आणि विमल पुंडे आणि प्रसिद्ध उद्योजक सिद्धांत बागरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत समता स्कूलमधील ‘कला प्रदर्शन’ उत्साहात पार पडले आहे.
एक कला प्रदर्शन पारंपारिकपणे अशी जागा आहे जिथे कला ऑब्जेक्ट्स (सर्वात सामान्य अर्थाने) प्रेक्षकांना भेटतात.प्रदर्शन सार्वभौमपणे काही तात्पुरत्या काळासाठी समजले जाते.असेच प्रदर्शन समता समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कला प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे योगाभ्यासाचे प्रसिद्ध प्रशिक्षक दत्तात्रय पुंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,”कमी वयात विद्यार्थ्यांमधील कलाकुसर विकसित करण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने भरविणे हे चांगले माध्यम असून याद्वारे समता स्कूलने लक्षवेधी उपक्रम राबविला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रति काही तरी करण्याची,एक सामाजिक दायित्वाची ओळख होणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तू कौतुकास्पद आहे.
सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
प्रसंगी योगाभ्यासाचे प्रशिक्षक दत्तात्रय पुंडे आणि विमल पुंडे आणि प्रसिद्ध उद्योजक सिद्धांत बागरेचा यांचा सत्कार स्वाती कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,मुख्य कार्यवाह संदीप कोयटे, उद्योजक सिद्धांत बागरेचा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.कला प्रदर्शनाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले आहे.