कोपरगाव तालुका
तळेगांव-मळे येथे “एक पणती सैनिकांसाठी” सोहळा साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव-मळे येथे शैनेश्वर युवा प्रतिष्ठान च्या वतीने आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता,यांचा “एक पणती भारतीय सैनिकांसाठी” या सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला,या सोहळ्याचे ४थे वर्ष होते.या कार्यक्रमासाठी शैनेश्वर युवा प्रतिष्ठानचे महेंद्र टूपके,सोमनाथ क्षिरसगाव,ज्ञानेश्वर वरकड,गोरखनाथ टुपके,ज्ञानेश्वर टुपके,अक्षय साबळे,रामेश्वर टुपके,गौरव जाधव,सुजित टुपके,गोरख वैद्य,दत्ताञय पवार,बाबासाहेब टुपके आदी सह सर्व सदस्य,ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमात पहिली पणती लावण्याचा मान दहेगाव बोलका येथील शहीद जवाण सुभेदार सुनील वलटे याचे वीर पिता रावसाहेब वलटे यांना देण्यात आला तसेच शैनेश्वर युवा प्रतिष्ठाण हे दहेगाव-बोलका येथील शाहिद सुभेदार सुनील वलटे यांचे नाव अमर रहावे म्हणून गावांतील ज्या तरुणांना सैन्यदलात जायचे असल्यास त्यास मदत करणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र टूपके यां नी केले,आजी-माजी सैनिकांनी आपल्या मनोगतात देशसेवा करतानाचे अनुभव गावातील तरुणांच्या पुढे मांडले तसेच त्यांनी तरूणांनी शिक्षण घेऊन सैन्यात जाऊन देशसेवा करावी असे आवाहन देखील केले तर शैनेश्वर युवा प्रतिष्ठानच्या या कार्याचे कौतुक केले आहे.युवा प्रतिष्ठान च्या वतीने दहेगाव बोलका,तळेगाव-मळे,गोधेगाव,घोयेगाव,भोजडे,धोत्रे,लौकी,असे संपूर्ण तालुक्यातील सैन्यदलात असणाऱ्या सर्व आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचा गौरव देशसेवेच्या प्रति ऋण म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने सम्मान पत्र देण्यात आले.तसेच दिवाळीच्या निमित्ताने आपल्या भारतीय जवानांना ऊर्जा मिळावी म्हणून एक पणती लावून भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कार्याला सलामी तळेगाव मळे गावात देऊन दिवाळी साजरी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास कोपरगाव तालुका एक्स आर्मी असोसिएशनचे अध्यक्ष मेजर युवराज गांगवे उपाध्यक्ष मेजर मारुती कोपरे,मेजर रामनाथ वर्पे,मेजर गोपीनाथ गांगुर्डे,आचारी मेजर,विकास मुळेकर,मेजर खटकाळे,मेजर देविदास गवांडे जालिंदर जगताप आदी सह सेवेत रुजू असणारे
मेजर दत्तात्रय चव्हाण,मेजर कोळसे,मेजर जाधव,मेजर पठाडे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.