जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

अंमली पदार्थांमुळे तरुणाईचे मोठे नुकसान-..या पोलिस अधिकाऱ्यांचे प्रदीपादन

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

   वर्तमानात तरुण पिढी तंबाखूजन्य पदार्थ आणि तत्सम अमली पदार्थांकडे आकर्षित होत असल्याने परिणामी देश व समाजाची मोठी हानी होत असल्याने तरुणांनी वेळीच सावध होऊन अमली पदार्थांच्या राक्षसापासून दूर राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

“दरवर्षी भारतभर अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे इंटरनेट व स्मार्टफोनच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी दुसरीकडे अमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसते.महासत्तेच्या मार्गावर असलेल्या भारतीयांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे.समज अपसमज यामुळे तरुण पिढी तंबाखूजन्य पदार्थ विली सिगारेट आधी अमली पदार्थांकडे आकर्षित होते परिणामी देश व समाजाची मोठी हानी होते.म्हणून तरुणांनी वेळीच सावध होऊन अमली पदार्थांच्या राक्षसापासून दूर राहिले पाहिजे”-उद्धव डमाळे,पोलिस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.

   दरवर्षी २६ जून हा दिवस,” जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन” म्हणून पाळला जातो.हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे घोषित केला गेला आहे.याचा मुख्य उद्देश अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी थांबवणे हा आहे.तरूण पिढीला व समाजाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध जागतिक लढा देणे.त्याचे मोठे दुष्परिणाम तरुणपिढी आणि लहान बालकांना होत असून समाजाचे मोठे नुकसान होत आहे.परिणामी शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहे.ड्रग्स किंवा कोणत्याही नशेमुळे कर्करोग, मानसिक ताण,स्मरणशक्ती कमजोर होणे आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.म्हणून हा ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ पाळला जात आहे.त्यातून तरुणाईत व्यसनाधिनता कमी करण्यासाठी व्याख्याने आयोजित केले जाऊन त्यांचे प्रबोधन केले जात आहे.कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,ध्येयपूर्ती अॅकॅडमी व कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे हे होते.

   सदर प्रसंगी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत कुऱ्हाडे,महाविद्यालयाचे विज्ञान शाखा प्रमुख डॉ.बापूसाहेब भोसले,वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.संतोष पगारे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.गणेश शिंदे तसेच इतर प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” दरवर्षी भारतभर अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे इंटरनेट व स्मार्टफोनच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी दुसरीकडे अमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसते.महासत्तेच्या मार्गावर असलेल्या भारतीयांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे.समज अपसमज यामुळे तरुण पिढी तंबाखूजन्य पदार्थ विली सिगारेट आधी अमली पदार्थांकडे आकर्षित होते परिणामी देश व समाजाची मोठी हानी होते.म्हणून तरुणांनी वेळीच सावध होऊन अमली पदार्थांच्या राक्षसापासून दूर राहिले पाहिजे,”अमली पदार्थांशी नाते म्हणजेच ‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ असल्याचे मानले जात आहे.अमली पदार्थांच्या आहारी जाणारा माणूस सदसदविवेक हरवून बसतो.त्यामुळे समाज व देशाच्या हितासाठी अशा अभियानांना सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद गरजेचा आहे.चांगुलपणा ही देखील एक प्रकारची देशभक्तीच होय.स्मार्टफोनच्या आहारी जाणे हे एक प्रकारचे व्यसनच होय.त्या ऐवजी तरुणांनी वाचनातील,अभ्यासातील आनंद घेऊन तो शेअर केल्यास आणि ध्येय ठरवून वाटचाल केल्यास ते नक्कीच देशाचे भवितव्य उज्वल करतील”असा आशावाद शेवटी पोलिस निरीक्षक डमाळे यांनी व्यक्त केला आहे.

   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे म्हणाले की “सोमैया महाविद्यालयात कोपरगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने अनेक विद्यार्थीकेंद्रित व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.आजचा उपक्रम देखील त्याच प्रकारचा असून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ जरूर घ्यावा.सोमैया महाविद्यालयाने 64 वर्षांच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान अधिकारी,शिक्षक,प्राध्यापक,वकिल,समाज सुधारक व उत्तम नागरिक घडविले आहेत.आज या परिसरातील चौथी पिढी आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.त्यामुळेच सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.आजही महाविद्यालय त्याच वाटेने मार्गक्रमण करीत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा”असे आवाहन यांनी शेवटी केले आहे.

  याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी कला शाखाप्रमुख डॉ.जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ.रवींद्र जाधव यांनी केले आहे तर डॉ.सुरेश देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close