जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेची आत्महत्या,आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत रहिवासी असलेल्या विवाहित महिलेला (वय-33) तिचे अनैतिक संबंधाचे भ्रमणध्वनीवर तिला पाठवलेले लघुसंदेश आणि चलचित्रण प्रसारित करण्याची धमकी देत असलेल्या तरुणांच्या धमकीने भयभीत झालेल्या महिलेने आपल्याच घरात बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे याबाबत शहर पोलिसांनी करण वाघ याचे विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.मात्र अद्याप अटक केली असल्याचे दिसत नाही.

  

मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आता जीवघेणे ठरू लागले आहेत.अनैतिकता वाढीस लागली आहे.समाजाचा नैतिक ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्यातच सोशल मीडियावर ट्रोलिंग करणे,अश्लील किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या करणे,आणि ब्लॅकमेलिंग (उदा.खाजगी फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे) यांमुळे अनेक तरुण तरुणी,महिला या टोकाचे पाऊल उचलतात.त्यामुळे आत्महत्येत वाढ झाली आहे.अशीच एक घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली आहे.त्यामुळे नागरिकांत संताप आणि संवेदना एकाच वेळी व्यक्त होत आहे.

   मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण,महिलामध्ये आणि मुलांमध्ये वाढणाऱ्या आत्महत्येच्या घटना ही खरोखरच एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे.तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असला,तरी त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आता जीवघेणे ठरू लागले आहेत.अनैतिकता वाढीस लागली आहे.समाजाचा नैतिक ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्यातच सोशल मीडियावर ट्रोलिंग करणे,अश्लील किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या करणे,आणि ब्लॅकमेलिंग (उदा.खाजगी फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे) यांमुळे अनेक तरुण तरुणी,महिला या टोकाचे पाऊल उचलतात.सोशल मीडियावर इतर लोकांचे ‘दिखाऊ’ आनंदी आयुष्य पाहून तरुण स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतात.यामुळे त्यांच्यात न्यूनगंड,नैराश्य आणि एकटेपणा वाढत असून परिणामी आत्महत्येत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे.कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत अशीच घटना उघडकीस आली आहे.

   या घटनेतील आरोपी आणि मयत महिलेचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध होतेअशी चर्चा आहे.त्यातून त्यांनी एकमेकाला भ्रमणध्वनीवरून लघुसंदेशाची व चलचित्रणाची (व्हिडिओ) देवाणघेवाण झाली असल्याची वंदता होती.त्यातच चार ते पाच महिन्यापासून त्यांच्या संबंधात बेबनाव तयार झाला होता.मात्र अलीकडील काळात सदर महिला सदर आरोपी तरुणास टाळत होती.परिणामी त्याने तिला धमक्या देणे सुरू केले असल्याची चर्चा सुरू आहे.त्यातच त्याने त्यांच्यात झालेल्या लघुसंदेशाची (मेसेज) आणि चलचित्रण (व्हिडिओ) सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती.परिणामी सदर महिला गेले काही दिवसापासून मोठ्या तणावात होती.परिणामी तिने आपली समाजात आपली बदनामी होऊ नये या भीतीने काल सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घरी कोणी नाही याची संधी साधत घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सदर महिलेला पती,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने आदींनी भेट दिली आहे.सदर महिलेचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.दरम्यान सदर महिलेवर आज दुपारी 03 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक ५०१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८,३५१(२) प्रमाणे गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close