जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ चार आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर वाहनांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव कोपरगाव शहर पोलिसांनी उधळून लावला असल्याची घटना उघडकीस आली आहे.नगर-मनमाड मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची झडती घेतली असता तलवार,कत्ती,वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी खिळे ठोकलेल्या लाकडी फळ्या आणि बनावट नोटांची बंडले आढळून आली.याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांना नुकतेच कोपरगाव येथील अतिरिक्त दंडाधिकारी न्या.तांबोळी यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे माहिती हाती आली आहे.

दरम्यान विवेक शेलार,ओमकार मारुती जगताप,रोहित सुरेश परब आणि बाळकृष्ण राहुल सपकाळे   यांना पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.

   महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांत लूटमारीच्या आणि चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ अत्यंत चिंताजनक आहे.प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला असून,रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.महामार्गावर काही विशिष्ट निर्जन टप्प्यांवर विशेषतः औरंगाबाद,जालना आणि विदर्भ भागातील काही पट्ट्यांमध्ये आणि आता नगर आणि नाशिक जिल्ह्यातही वाहनांवर दगडफेक करून किंवा रस्त्यावर अडथळे निर्माण करून वाहने थांबवली जातात आणि प्रवाशांना लुटले जाते.महामार्गावरील वन्यजीवांसाठी बनवलेले अंडरपास,उड्डाणपूल आणि बाजूच्या सेवा रस्त्यांवरून स्थानिक चोरांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी अद्यापही पुरेसा प्रकाश (स्ट्रीट लाईट्स),सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल नेटवर्कची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत समृद्धी महामार्गाच्या खाली रस्ता लुटीच्या उद्देशाने थांबलेली एक टोळी पोलिसांना आढळून आली आहे.गस्तीवर असलेल्या कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाने त्यांना संशयास्पद रित्या अटक केली आहे.त्यातील चार जणांना अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे.ही कारवाई बुधवार दि.९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

 

   कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रवीण वसंत रनधीर यांच्यासह होमगार्ड पथक समृद्धी महामार्ग परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पुलाखाली एक पांढऱ्या रंगाची पिकअप् (एम.एच.०५ एफ.जे.१७९८) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसले होते.पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन चौकशी केली असता त्यातील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या होत्या.वाहनातील एका व्यक्तीने महामार्गावर भेटणाऱ्या व्यक्तींना लुटण्याच्या उद्देशाने धमकावण्यासंदर्भात चर्चा केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी कारवाई करत वाहनातील व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाईत विवेक भरत शेलार (वय-२३),ओमकार मारुती जगताप (वय-१९),रोहित सुरेश परब (वय-३१) आणि बाळकृष्ण राहुल सपकाळे (वय-१९) यांना ताब्यात घेतले आहे.

   दरम्यान पोलिसांनी पिकअप वाहनासह एकूण सुमारे ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 502/2026,भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(४), ३१० (५) तसेच शख अधिनियमातील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजीराव गायकवाड तसेच शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील सूचना दिल्या आहे.शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे करीत आहेत.

   दरम्यान विवेक शेलार,ओमकार मारुती जगताप,रोहित सुरेश परब आणि बाळकृष्ण राहुल सपकाळे   यांना पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close