जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

विमलबाई जगताप यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


संवत्सर (वार्ताहर)


  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील दशरथवाडी परिसरातील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ गृहिणी विमलबाई एकनाथराव जगताप यांचे आज दुपारी १.३० वाजता निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्या ९६ वर्षांच्या होत्या.संवत्सर येथील अमरधामध्ये त्यांच्यावर रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

स्व.विमलबाई जगताप यांचे छायाचित्र.

     स्व.विमलबाई ह्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाने संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी शेती व प्रपंच यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. गृहिणी म्हणून त्यांनी प्रपंच यशस्वी करून दाखवला.त्यांच्या पश्चात नंदकुमार जगताप व अरुणराव जगताप ही दोन मुले तसेच प्रवीण,नागेश,युवराज,राकेश,सुमीत,सुरज हे नातू व सुना असा मोठा परिवार आहे.कै.विमलबाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे आदींनी शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close