शैक्षणिक
उत्तर नगर जिल्ह्यात दोन गटशिक्षणाधिकारी होणार रुजू !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा तांत्रिक सेवेमधील “विस्तार अधिकारी” १ संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा मधील उपशिक्षणाधिकारी तत्सम या संवर्गातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत अधिसूचना राज्य शासनाने नुकतीच जारी केली असून त्यात राज्यातील ५१ जणांना संधी देण्यात आली असून त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव या ठिकाणी वर्ग एकचे दोन गट शिक्षणाअधिकारी रुजू होत असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाली असून त्यात अनुक्रमे अभयकुमार सूर्यकांत वाव्हळ व रवींद्र किसनराव कापरे या दोघांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या या पदावर पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी मिळणार असल्याने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान पूर्वी राहाता येथे पोपट काळे हे गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या नंतर वर्तमानात राहता येथे राजेंद्र पावसे गेली चार वर्षापासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे तर कोपरगावात २०१० मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून महारुद्र नाळे यांनी या पदावर कर्तव्य बजावले होते.त्यानंतर वर्तमानात शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख यांचेकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असून त्या तो अनेक वर्षापासून सांभाळत आहे.त्यांची या ताणतणावातून सुटका होणार असल्याचे मानले जात आहे.
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.शिक्षण संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून दिलेल्या आदेशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी (तालुका स्तरीय) यांच्यामार्फत सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते.गटशिक्षणाधिकारी हे शिक्षण विभागात महत्वाचे पद मानले जाते.त्यांचेद्वारे आपल्या कार्यक्षत्रातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन करण्याबरोबरच शाळांवर नियंत्रण ठेवणे आणि शासनाच्या नियमांनुसार कामकाज चालते की नाही हे पाहणे,शासनाच्या शैक्षणिक धोरणांचे योग्य पालन करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे,
शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे,शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करणे,जेणेकरून त्यांची शिकवण्याची पद्धत अधिक प्रभावी होईल.याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणे,शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी करणे आणि आवश्यक सुधारणा करणे आदी महत्वपूर्ण कामे केली जातात.

दरम्यान सरकारने आर्थिक कोंडीमुळे गेली अनेक वर्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केलेली नसल्याने प्रशासन अधिकारी कर्मचारी टंचाईचा सामना करत आहे.आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा मोठा बोजा असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागत आहे.त्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे नेतृत्व करत असलेल्या राहाता आणि राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे नेतृत्व करत असलेल्या कोपरगाव तालुक्याला नवीन गटशिक्षण अधिकारी या निमित्ताने मिळणार असल्याने कोपरगाव तालुक्यातील शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र ही नेमणूक अल्पकालीन असल्याने हे समाधान किती दिवस टिकणार हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
दरम्यान पूर्वी राहाता येथे पोपट काळे हे गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या नंतर वर्तमानात राहता येथे राजेंद्र पावसे गेली चार वर्षापासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे तर कोपरगावात २०१० मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून महारुद्र नाळे यांनी या पदावर कर्तव्य बजावले होते.त्यानंतर वर्तमानात शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख यांचेकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असून त्या तो अनेक वर्षापासून सांभाळत आहे.त्यांची या ताणतणावातून सुटका होणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.काळे गटाला त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडात स्वतंत्र गट शिक्षणाधिकारी आणण्यास अपयश आले असल्याचे दिसून आले होते.



