शैक्षणिक
…या महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा उद्बोधन वर्ग संपन्न

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात नुकतेच प्रथम वर्ष विज्ञान,संगणक शास्त्र,सायबर सेक्युरिटीच्या वर्गातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नुकताच उद्बोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख,विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती तसेच करिअरविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमातून देण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

“विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व कौशल्यविकास उपक्रम राबविले जातात.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख व्हावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे”-डॉ.माधव सरोदे,श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय,कोपरगाव.
महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जाणारा उद्बोधन वर्ग हा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वातावरण,नियम आणि सुविधांची ओळख करून देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो.याद्वारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक,अभ्यासक्रम आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती मिळते.उद्बोधन वर्गाचा मुख्य हेतू हा महाविद्यालयाची व परिसराची,महाविद्यालयाची इमारत,वर्ग,ग्रंथालय,प्रयोगशाळा,आणि क्रीडांगण आदींची माहिती दिली जाते.त्यातून निवडलेल्या विषयांचे स्वरूप,परीक्षा पद्धत,गुणदान प्रणाली आणि शैक्षणिक नियम समजावले जातात.प्राध्यापक,मार्गदर्शक आणि इतर सहकाऱ्यांशी संवाद घडवून आणला जातो.परिणामी विद्यार्थी आणि प्राध्यापक,महाविद्यालयात संवाद निर्माण होऊन आपुलकी निर्माण होते.असाच उपक्रम कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ,विज्ञान,संगणक शास्त्र व सायबर सेक्युरिटी विभागातील सर्व प्राध्यापक तसेच नवप्रवेशित विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे म्हणाले की,“विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व कौशल्यविकास उपक्रम राबविले जातात.प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख व्हावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना शिस्त,जबाबदारी आणि आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचे पालन करणे हेच यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी प्रा.दिलीप भोये,शिष्यवृत्ती योजनांविषयी धीरज सोनवणे,विद्यार्थी विकास मंडळाविषयी डॉ.माधव यशवंत,परीक्षा विभागाविषयी डॉ.देविदास रणधीर,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाविषयी डॉ.सीमा चव्हाण,शॉर्ट टर्म कोर्सेसविषयी प्रा.तानसेन रणदिवे,संशोधन विभागाविषयी डॉ.विलास गाढे,राष्ट्रीय सेवा योजनेविषयी प्रा.महेश दिघे,सांस्कृतिक विभागाविषयी प्रा.संतोष पवार,एन.सी.सी.विभागाविषयी प्रा. चंद्रभान चौधरी,ग्रंथालयाविषयी प्रा.चंद्रशेखर खैरनार,जिमखाना विभागाविषयी डॉ.विशाल पवार,प्लेसमेंट व करिअर मार्गदर्शनाविषयी दिलीप भोये तसेच महिला अत्याचार प्रतिबंधक समितीविषयी डॉ.उज्ज्वला भोर यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा,सेवा व विविध संधींची सविस्तर माहिती दिली आहे.यावेळी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी तेजस्विनी गायकवाड,कल्याणी शिंदे,अविनाश भागवत आदींनी मनोगत व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.श्रुती पाटील,प्रियंका पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.ऋषिकेश सोनवणे यांनी मानले आहे.



