शैक्षणिक
फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची…या फार्मसी कंपनीत भरारी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक असलेल्या कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी शैक्षणिक संकुलातील बी.फार्मसी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील १२ विदयार्थ्यांची विविध फार्मा कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली असून.ही निवड प्रक्रिया संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंट विभागातर्फे करण्यात आली अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ.नितिन जैन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
“आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाशी संलग्न असून बी.फार्मसी हा पदवी अभ्यासक्रम बारावी सायन्स नंतर चार वर्षे शिकवला जातो.आर.जे.एस.फार्मसी महाविद्यालयात नियमित तासिका,तज्ञ शिक्षक व्याख्यान,सुसज्य ग्रंथालय व नियमित प्रयोगशाळा प्रात्याशिके यांमुळे विदयार्थ्यांचा मूलभूत सर्वांगीण विकास झाला व त्यामुळेच महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक उगले याचे टेककेशर मेडीकल सर्विसेस मुंबई,राहुल सिनारे याचे अडव्हाटमेंट अहमदाबाद येथे निवड झाली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की,”आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाशी संलग्न असून बी.फार्मसी हा पदवी अभ्यासक्रम बारावी सायन्स नंतर चार वर्षे शिकवला जातो.सध्या स्पर्धेच्या काळात नोकऱ्या मिळणे अवघड आहे.परंतु आर.जे.एस.फार्मसी महाविद्यालयात नियमित तासिका,तज्ञ शिक्षक व्याख्यान,सुसज्य ग्रंथालय व नियमित प्रयोगशाळा प्रात्याशिके यांमुळे विदयार्थ्यांचा मूलभूत सर्वांगीण विकास झाला व त्यामुळेच महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक उगले याचे टेककेशर मेडीकल सर्विसेस मुंबई,राहुल सिनारे याचे अडव्हाटमेंट अहमदाबाद येथे निवड झाली आहे.तसेच इतर विद्यार्थीनी व विदयार्थ्यांची डाटा अनालिस्ट म्हणून ऑब्जेक्ट वेज टेक्नॉलॉजी,नाशिक येथे निवड झाली आहे.
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,विश्वस्त प्रसाद कातकडे,विजय कडू,श्री कोटमे,श्री नागरे तसेच प्राचार्य डॉ.नितिन जैन,विभागप्रमुख उषा जैन,विजय जाधव व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी संदिप लावरे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.