धार्मिक
राज्यपाल यांचा…या दिवशी अ.नगर जिल्हा दौरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असून शुक्रवार दिनांक ०७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती महोदय यांचे समवेत विमानाने काकडी विमानतळाकडे प्रयाण होणार आहे.दुपारी १२ वाजता काकडी विमानतळ,काकडी ता.कोपरगाव येथे आगमन होणार आहे.
दरम्यान दुपारी १२.१० वाजता राष्ट्रपती यांचे समवेत श्री साईबाबा मंदिर देवस्थानकडे प्रयाण.दुपारी १२.२५ वाजता राष्ट्रपती महोदया यांचे समवेत श्री साईबाबा मंदिर येथे आगमन होणार आहे.दुपारी १२.२५ ते १२.३५ राखीव रहाणार आहे.
दरम्यान दुपारी १२.३५ ते ०१.२०वाजता श्री साईबाबा मंदिर येथे आरती व दर्शनास उपस्थिती. दुपारी ०१.२० ते ०१.३० वाजता राखीव. दुपारी ०१.३० ते ०२.३० वाजता प्रसाद सेवन करण्यात येणार आहे.दुपारी ०२.३५ वाजता राष्ट्रपती महोदया यांचे समवेत श्री साईबाबा मंदिर येथुन काकडी विमानतळाकडे प्रयाण.दुपारी ०२.५० वाजता काकडी विमानतळ,काकडी ता.कोपरगाव येथे आगमन.राष्ट्रपती यांचे विमानतळावरील निरोप समारंभास उपस्थिती.दुपारी ०३ वाजता काकडी विमानतळ येथुन विमानाने मुंबईकडे प्रयाण होणार आहे.