निधन वार्ता
योगेश जगताप यांना पितृशोक
न्युजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी योगेश बाळासाहेब जगताप यांचे पिताश्री व संवत्सर विभाग बिग बागयतदार विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक बाळासाहेब सुकदेव जगताप यांचे नुकतेच रात्री १०.५० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्यावर गोदावरीतीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.बाळासाहेब जगताप हे अंत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे म्हणून संवत्सर परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.