शैक्षणिक
विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची आवश्यकता -भारती

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
तरुणांनी आपल्या जीवनात आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असून आपल्या जीवनशैलीत दृढ निश्चयाने सकारात्मक बदल घडवून आणावा असे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी कोपरगाव येथील एका कार्याक्रमात बोलताना केले आहे.

“रयत शिक्षण संस्थेतील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात.या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करता यावे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना रोजगाराची वसंधी मिळावी,हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते.विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांना दिशा देऊन ती साकार करण्याच्या उद्देशाने ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे”- ॲड.संदीप वर्पे,अध्यक्ष,स्थानिक महाविद्यालय विकास समिती,कोपरगाव.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी ही उमेदवारांना स्पर्धा परीक्षा (लेखी) आणि शारीरिक पात्रता चाचणी यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कठोर शारीरिक प्रशिक्षण,दर्जेदार मार्गदर्शन आणि नियमित सराव देते.ही गरज ओळखून कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड.संदीप वर्पे हे उपस्थित होते.
सदर प्रसंगी सदर उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले,नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले,प्रशिक्षक साजन चव्हाण,वरिष्ठ कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ,वरिष्ठ वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, डॉ.विशाल पवार,एस.आर.कदम यांसह भरती करू इच्छिणारे महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

“महाविद्यालयातील ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे,त्यांच्यात शिस्त,आत्मविश्वास व आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांना रोजगाराची संधी मिळावी,या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे”-डॉ.माधव सरोदे,प्राचार्य, श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालय,कोपरगाव.
त्यावेळी समितीचे अध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की,”महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचे स्वप्न आज साकार होत आहे,ही समाधानाची बाब आहे.समाजात पोलिसांविषयी आदरयुक्त भीतीची भावना असते.पोलिसांचे कर्तव्य,शिस्त आणि जबाबदारी यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
यावेळी एस.के.फिटनेस ॲकॅडमी संगमनेरचे सागर खालकर यांनी भरतीपूर्वक परीक्षेचे स्वरूप,फिटनेस,आहार,विहार व दैनंदिन नियोजन यावर मार्गदर्शन केले.ज्ञानदा अकॅडमी,सिन्नरचे संचालक सुदाम शेळके यांनी जीवनात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे असेल,तर करिअर आवश्यक आहे; म्हणून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन शेवटी केले आहे.यावेळी आत्मा मालिक भरतीपूर्व अकॅडमीचे संचालक साईनाथ वर्पे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातून मिळालेली प्रेरणा आणि ध्येयप्राप्तीसाठी करावा लागणारा संघर्ष यांचा जीवनपाठ विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी केले आहे तर उपस्थित पाहुण्यांचा परीचय कनिष्ठ विभागाचे प्रभारी उपप्राचार्य रवींद्र हिंगे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुनिता अत्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप शिंदे यांनी मानले आहे.



