निधन वार्ता
सर्जेराव कदम यांचे अपघाती निधन!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भाजप कोपरगाव तालुक्याचे माजी उपाध्यक्ष व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मीराबाई कदम यांचे पती सर्जेराव चांगदेव कदम (वय – 61) यांचे काल ट्रॅक्टर अपघातात निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात बाजीराव कदम हे एक भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सकाळी रवंदे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात आज सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

स्व.सर्जेराव कदम हे भाजपचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जात होते.त्यांनी सन-1999 साली भाजपकडून सुरेगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती.मात्र सन-2011 साली कोपरगाव तालुक्यात नितीन औताडे यांनी कोपरगाव विकास आघाडी स्थापन केल्यावर त्यांनी त्यात प्रवेश करून त्या आघाडीत ते सामील झाले होते.त्यांची पत्नी मीराबाई कदम या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आघाडीच्या विद्यमान संचालक आहेत.
स्व.सर्जेराव कदम हे भाजपचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जात होते.त्यांनी सन-1999 साली भाजपकडून सुरेगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती.मात्र सन -2011 साली कोपरगाव तालुक्यात नितीन औताडे यांनी कोपरगाव विकास आघाडी स्थापन केल्यावर त्यांनी त्यात प्रवेश करून त्या आघाडीत ते सामील झाले होते.त्यांचे पिताश्री स्व.चांगदेव कदम हे संजीवनी सहकारी साखर कारखाना स्थापन करताना संस्थापक संचालक होते.त्यांचा वारसा त्यांनी चालवला होता.ते काल रात्री 8.30 च्या सुमारास आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्या सहकाऱ्याकडून आणलेले कॅल्टिव्हेटर पोहचवण्यासाठी रवंदे येथून मळेगांव थडी येथे जात असताना कुर्ला नाल्यात त्यांच्या ट्रॅक्टरला अपघात होऊन त्यात खोल नाल्यात पडून ते जॉन डियर या ट्रॅक्टरखाली दबले गेले होते.

दरम्यान त्यांनी पोहोचण्यापूर्वी आपले सहकारी आरगडे काका यांना दूरध्वनीवरून संपर्क करून,” मी पाच मिनिटात पोहचत आहे” असा संदेश दिला होता.मात्र वेळ उलटूनही ते का आले नाही हे पाहण्यासाठी आरगडे हे आपल्या दुचाकीने जात असताना त्यांना त्यांचा ट्रॅक्टर कुर्ला नाल्यात खोल खड्ड्यात पडलेला दिसला होता.त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने सदर ट्रॅक्टर काढण्यासाठी क्रेन यंत्र बोलावले होते.त्यांना घटनास्थळावून काढले असता व उपचार करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.स्व.सर्जेराव कदम यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



