जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…या गावात जल यात्रेची जोरदार तयारी!

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

  गोदा ते नर्मदा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या स्वागतासाठी संवत्सर येथे सोमवार दि.२७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे.
 राज्याच्या या जलयात्रेत महाराष्ट्रातील ३० प्रमुख नद्यांच्या जलकलशांचे पूजन करून ते नाशिक येथे एकत्रित करण्यात आले आणि तिथून यात्रेची सुरुवात झाली आहे.गोदावरी आणि नर्मदा या पवित्र नद्यांना जोडणे आणि राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती रुजवणे हा या यात्रेचा उद्देश असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी दिली आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही यात्रा गोदावरी (नाशिक/चोंडी) ते नर्मदा (महेश्वर,मध्य प्रदेश) या दरम्यानची सुमारे ८५० किलोमीटरची यात्रा आहे.या यात्रेत महाराष्ट्रातील ३० प्रमुख नद्यांच्या जलकलशांचे पूजन करून ते नाशिक येथे एकत्रित करण्यात आले आणि तिथून यात्रेची सुरुवात झाली आहे.गोदावरी आणि नर्मदा या पवित्र नद्यांना जोडणे आणि राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती रुजवणे हा या यात्रेचा उद्देश मानला जात आहे.

  ही जलयात्रा जलसंपदा विभागाच्या वतीने जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोदा ते नर्मदा -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा’ प्रारंभ आज दि.२५ एप्रिल रोजी चौंडी (ता. जामखेड ) व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ( जि. नाशिक ) येथून झाली असून ती सोमवार, दि.२७ एप्रिल २०२६ रोजी ठीक ०९:१५ वा संवत्सर चौफुली येथून जाणार असल्याने तिचे या ठिकाणी जोरदार स्वागत होणार असल्याची माहिती राजेश परजणे यांचे वतीने देण्यात आली आहे.

ही जलयात्रा केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता, “पाणी हीच जीवनरेखा” या जाणिवेला समाजमनात दृढ करणारी परिवर्तनाची चळवळ ठरणार आहे.प्रत्येक नागरिकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा,यासाठी ही जलयात्रा प्रेरणादायी ठरेल. शासन,प्रशासन आणि जनसहभाग यांच्या एकत्रित शक्तीतून जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन घडवत,भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध जलभविष्य निर्माण करण्याचा ठाम संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.या जल यात्रेचे स्वागत महंत रमेशगिरीजी महाराज,जंगलीदास माऊली महाराज आणि संवत्सर येथील महानुभाव आश्रमाचे महंत राजधरबाबा आदी मान्यवर करणार आहेत.

  दरम्यान ही जलयात्रा कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावातून सोमवार दि.२७ एप्रिल २०२६ रोजी ठीक ०९:१५ वा संवत्सर चौफुली येथून जाणार आहे.तरी तालुक्यातील सर्व नागरिक बंधू – भगिनींनी  या ऐतिहासिक जलयात्रेचे स्वागत करण्यासाठी सकाळी ०९ वाजता संवत्सर चौफुली येथे उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close