कोपरगाव शहर वृत्त
…या नगरपरिषदेस थकबाकीदारांना 50 टक्के शास्ती माफ योजना मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेचे सत्ताधारी भाजप (कोल्हे) गटाने आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केल्या प्रमाणे आज शहरातील नागरिकांची घर पट्टीच्या 50 टक्के शास्ती माफीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जाहीर केला आहे.त्यामुळे थकबाकीदार नागरिकांची आगामी 31 मार्च पर्यंत थकबाकी भरणाऱ्या जवळपास रु.९१ लाख ९६ हजार ७२८ रुपयांची शास्ती माफी होणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली आहे.त्यामुळे थकबाकीदार नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेची ही,’कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना’ आहे आणि शास्ती माफीचा प्रस्ताव दिनाक 13 मार्च पासून लागू झाला आहे.तर तीच शास्ती माफीचा दिनाक समजला जाणार आहे.त्यामुळे ही तारीख मंजुरीची समजली जाणार आहे.या मंजूर झाल्या तारखेपासून नगरपरिषदेस तो 30 दिवसाच्या आत राबवावा लागणार आहे.त्यानंतर आपली थकबाकी भरणाऱ्या नागरिकांना ही सवलत मिळणार नाही”- सुहास जगताप,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रथमच थकीत पाणीपट्टी व घरपट्टीच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता.ही सवलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधीपुरती मर्यादित होती.घरपट्टीमध्ये केवळ निवासी मिळकतींसाठी ही योजना आहे.गावचा कारभार चालविणाऱ्या ग्रामपंचायतींचा मुख्य आर्थिक उत्पनाचा स्त्रोत म्हणून घरपट्टी,पाणीपट्टी व दिवाबत्ती कराकडे पाहिले जाते.परंतु,या कराच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतींना दरवर्षी मर्यादा येत येतात.काहीवेळा गावात नुसते घर असते;परंतु नोकरीनिमित्त सर्वजण बाहेर असतात.त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत जाते.याचा परिणाम गावातील विकासकामांवर होतो.त्यामुळे या थकबाकीच्या वसुलीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेने याबाबत अशीच मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती.त्यामुळे जिल्हाधिकारी पंकज आशिया नेमकी काय भूमिका घेणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागून राहिले होते.मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश पारित केला असून त्यात घर पट्टीच्या शास्तीबाबत हा पन्नास टक्के माफीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

कोपरगावात अशी दंडाची रक्कम जवळपास 01 कोटी 83 लाख 93 हजार 455 इतकी होती.त्यात पन्नास टक्के सवलत दिल्याने आता नगरपरिषदेस आता 91 लाख 96 हजार 728 रुपयांचा नागरिकांना लाभ होणार आहे.तर तेवढीच रक्कम शास्ती माफीमुळे नगरपरिषदेस नुकसान होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान व उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केले आहे.
दरम्यान कोपरगाव येथील “कोपरगाव नगरपरिषद,कोपरगाव महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ चे कलम १५० (अ) (१) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर दरमहा २% शास्ती लावली जाते.तथापि,ही शास्तीची रक्कम विहित वेळेत न भरल्याने शास्तीची रक्कम,मालमत्ता करांच्या रकमेपेक्षा जास्त होते आणि ती वाढतच राहते व कालांतराने विविध कारणास्तव मालमत्ताधारक ही रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात.या सर्वांचा परिणाम म्हणून मालमत्ता कर थकबाकीचे प्रमाण वाढत जाते.मालमत्ताधारकाच्या एकूण थकबाकीमध्ये अशा प्रकारे भरमसाट वाढ होऊन ती वेळेवर अदा न केल्याने याचा विपरित परिणाम कर वसुलीवर देखील होतो.यावर उपाययोजना म्हणूनच,नगरपरिषदा क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना लागू करण्याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात आलेला आहे.सदर योजनेचा मूळ उद्देश हा केवळ सरसकट शास्ती माफी नसून थकीत कराच्या वसुलीस प्रोत्साहन मिळावे हा असल्याची माहिती मुख्याधिकारी जगताप यांनी दिली आहे.कोपरगावात अशी दंडाची रक्कम जवळपास 01 कोटी 83 लाख 93 हजार 455 इतकी होती.त्यात पन्नास टक्के सवलत दिल्याने आता नगरपरिषदेस आता 91 लाख 96 हजार 728 रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे.तर तेवढीच रक्कम शास्ती माफीमुळे नागरिकांना फायदा होणार आहे.मात्र ही सवलत जे थकबाकीदार नागरिक आपली थकबाकी आगामी 31 मार्च आत भरणार आहे.त्यांना एकदाचं मिळणार आहे.
दरम्यान ही,’कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना’ आहे आणि शास्ती माफीचा प्रस्ताव दिनाक 13 मार्च पासून लागू झाला आहे.तर तीच शास्ती माफीचा दिनाक समजला जाणार आहे.त्यामुळे ही तारीख मंजुरीची समजली जाणार आहे.या मंजूर झाल्या तारखेपासून नगरपरिषदेस तो 30 दिवसाच्या आत राबवावा लागणार आहे.त्यानंतर आपली थकबाकी भरणाऱ्या नागरिकांना ही सवलत मिळणार नाही अशी माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे वसुलीला वेग मिळणार असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.



