शैक्षणिक
रुग्ण सावरले,आज दिवसभर अधिकारी,कर्मचाऱ्यांची झाडाझडती !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ईशान्यगडाशी संबंधित असलेल्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात 10 मार्चच्या सायंकाळी 07 वाजेच्या सुमारास दूषित पाण्यामुळे जवळपास शंभर विद्यार्थिनी अस्वस्थ झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या पदाधिकारी आणि प्रशासन यांची मोठी तारांबळ उडाली असून त्यांनी काल दिवसभर विविध तपासण्या आणि जेवणाचे डबे देणाऱ्या नागरिकांच्या जोर बैठकांचा सपाटा लावला असल्याचे दिसून आले असून त्यांना एक अतिरिक्त डबा देण्याचे फर्मान सोडले असल्याची विश्वंसनीय माहिती हाती आली आहे.तर बहुतांशी विद्यार्थिनींना आता आज सकाळपर्यंत रुग्णालयातून सोडून दिले असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या डब्यात एक अतिरिक्त डबा आणण्यास सांगितले असून कर्मचाऱ्यांना त्याची स्वतः आधी चाचणी घ्यावी लागणार आहे.त्यानंतरच पुढील विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे दिले जाणार असल्याची माहिती आहे.तर काल सायंकाळी ‘न्यूजसेवा’ वेब पोर्टलचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर संस्थाचालकांनी याबाबत आरोग्य प्रशासनास कळवले असून पाणी तपासणीसाठी पाठवल्याचा दावा केला आहे.मात्र या बाबत प्रशासन आज सकाळ पर्यंत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.
कोपरगाव शहराच्या ईशान्येस सुमारे अडीच कि.मी.अंतरावर असलेल्या ग्रामीण शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेणाऱ्या व वसतिगृहात रहिवासी असलेल्या शंभरहून अधिक विद्यार्थिनींना उलट्या,मळमळ विषबाधा सदृश बाधा झाली होती.त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांची मोठी तारांबळ उडाली होती.त्यांना परवा 10 मार्चच्या रात्री रुग्ण वाहिकांची मोठी वर्दळ आयुर्वेद रुग्णालयात वाढली असल्याचे दिसून आले होते.त्यांना तातडीने उपचार सुरू करून आज सकाळपर्यंत बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सोडून दिले असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही.तथापि त्यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा.साहेबराव दवगे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचे विश्वस्तांनी बोलून सदर घटना ही उन्हामुळे झाल्याचा दावा केला आहे.अशी कोणतीही घटना झाली असल्याचा इन्कार केला आहे.
दरम्यान घटनेची गंभीर दखल घेऊन आज दिवसभर पदाधिकारी,विश्वस्त मंडळ आणि प्रशासन अधिकारी आदींनी आपल्या जोरबैठकांचा सिलसिला सुरू ठेवला होता.त्यात त्यांनी जवळपास 09 ते 10 हजार विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवणारे डबेवाले,अधिकारी,त्यांच्याशी संलग्न नागरिक,कर्मचारी आदींना बोलावून बैठका घेतल्या आहेत.व हा प्रकार नेमका कशामुळे घडला आहे.याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.

दरम्यान या डब्यात एक अतिरिक्त डबा आणण्यास सांगितले असून कर्मचाऱ्यांना त्याची स्वतः आधी चाचणी घ्यावी लागणार आहे.त्यानंतरच पुढील विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे दिले जाणार असल्याची माहिती आहे.तर काल सायंकाळी ‘न्यूजसेवा’ वेब पोर्टलचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर संस्थाचालकांनी याबाबत आरोग्य प्रशासनास कळवले असल्याचा दावा केला आहे.मात्र या बाबत प्रशासन आज सकाळ पर्यंत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.तर दुसरीकडे पाण्याची टाकी आणि जल शुद्धिकरण यंत्रे काल पासून आज दिवसभर तपासणी सुरू असल्याची माहिती आहे.दरम्यान या घटनेनंतर तातडीने पाण्याचे नमुने शासकीय यंत्रणेकडून तपासणी करून घेण्यासाठी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.मात्र अद्याप पाणी तपासणीचे अहवाल आलेले नाही अशी माहिती समजत आहे.त्याला स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.



