जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगावची भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन-…या महंतांचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    “कोपरगांव तालुक्याची पावनभुमी संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असुन दक्षिणगंगा गोदावरी नदी तिरावर अनेक ऋषी मुनी संत महंतांनी तपश्चर्या करून गुरु शुक्राचार्यांच्या संजीवनी मंत्राने ही भूमि सिध्द झालेली असल्याचे प्रतिपादन जनार्दन स्वामी मंदिराचे महंत रमेशगिरी महाराज यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा करताना महंत रमेशगिरीजी महाराज,विवेक कोल्हे,रेणुका कोल्हे, नितीन कोल्हे आदी दिसत आहेत.

सदर प्रसंगी मंदिर निर्माणकर्ते अभियंता सोमेश जगदिश कायस्थ,योगेश कुलकर्णी,नितीन आपटे यांचा यावेळी रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला आहे तर कार्यकमाचे पौरोहित्य राक्षसभूवन येथील ब्रम्हवृंद व शेगांव गजानन महाराज मंदिराचे गुरू नागेश मथुरादास चौथाईवाले उर्फ तात्यागुरू आदींनी केले आहे.

 
   राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी संजीवनी साखर कारखाना कार्यस्थळावर मारूती मंदिरालगत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या संकल्पनेतुन जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलते होते आहे.

  

जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा करताना महंत रमेशगिरीजी महाराज,बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,विवेक कोल्हे,रेणुका कोल्हे, नितीन कोल्हे आदी दिसत आहेत.

    सदर प्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे,सिंधुताई शंकरराव कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी युनिव्हरसिटीचे अध्यक्ष अमित कोल्हे,कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे,ईशान कोल्हे,श्रध्दा ईशान कोल्हे,कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,संचालक विश्वास महाले,पांडुरंग शिंदे,त्रंबक सरोदे,बाळासाहेब वक्ते,निलेश देवकर,राजेंद्र कोळपे,रमेश घोडेराव,कामगार नेते मनोहर शिंदे,स्वामी समर्थसेवा केंद्राचे संतोष जाधव,कार्यकारी संचालक सुहास यादव,मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाकुमार,अमोल चांदोरे,दत्तात्रय मोरे,भाजपायुवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गवळी,उस उत्पादक सभासद,शेतकरी,खाते प्रमुख, उपखातेप्रमुख,यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी,संचालक,शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”देवांचा देव महादेव असुन त्याला रूद्र नावाने देखील संबोधले जाते म्हणजेच सर्वांचे दुःख हरण करणारा महादेव असुन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी त्रंबकेश्वर दिंडीत ज्या ज्या वेळी प्रस्थान करत त्या त्या वेळी त्यांनी संजीवनीच्या मारूती मंदिरात मुक्काम करत अध्यात्म सेवा केली त्याची आठवण म्हणून या महादेवाचे आजपासून जनेश्वर महादेव मंदिर असे नामकरण होत आहे.ईश्वरीय श्रध्देतुन,नामस्मरणांतुन आपल्या सर्वांची दुःखे,चिंता हरण होवो अशी महादेवचरणी प्रार्थना असे म्हणत त्यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची आठवण जागृत केली असल्याचे शेवटी म्हणाले आहे.

    
   सदर प्रसंगी मंदिर निर्माणकर्ते अभियंता सोमेश जगदिश कायस्थ,योगेश कुलकर्णी,नितीन आपटे यांचा यावेळी रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला आहे. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे.

     सदर प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे प्रास्तविक केले तर या कार्यकमाचे पौरोहित्य राक्षसभूवन येथील ब्रम्हवृंद व शेगांव गजानन महाराज मंदिराचे गुरू नागेश मथुरादास चौथाईवाले उर्फ तात्यागुरू यांनी केले.त्यांना ब्रम्हवृंद रमाकांत गोडबोले,समर्थ घेवाळे,सागर पाटील,प्रमोद जोशी,रविंद्र गो-हे आदिंनी साथ दिली.यजमान म्हणुन सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते,संगीता बारहाते,संजय औताडे,उषाताई औताडे हे पुजाविधीस बसले होते.शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close