जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

तर राज्य भविष्यातही यशाची शिखरे गाठील -…या नेत्याचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   देशात महाराष्ट्र राज्य आजही क्रमांक एकवर असून पुढील काळातही हे राज्य अशीच प्रगती करीत यशाची नवनवी शिखरे गाठत राहील असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या सदिच्छा देताना आ.आशुतोष काळे,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,स्वच्छतादूत सुशांत घोडके आदी.

कोपरगाव शहराच्या वायव्येस असलेल्या जुना टाकळी रोड (जिल्हा प्रमुख मार्ग क्रं.-९९) निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या रस्त्याचे निकृष्ट काम आणि अतिक्रमणाबाबत  तक्रार प्राप्त झाली होती.त्याची तालुका प्रशासनाने दखल घेतली नव्हती.परिणामी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.मात्र तेथेही त्यांना अदखलपात्र केल्याने व दोषींवर कारवाई न झाल्याने तक्रारदार विजय जाधव यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता.अखेर हे आंदोलन स्थगित करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांना दखल घ्यावी लागली.चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपले आत्मदहन आंदोलन स्थगित केले आहे.

  दिनांक १ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाले,याच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.या दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.मुंबईसह महाराष्ट्र राज्यासाठी ज्या १०६ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यांना या दिवशी विशेष अभिवादन केले जाते.कोपरगाव तहसील कार्यालयात हा महाराष्ट्र दिन दिनाक ०१ मे सोजी सकाळी ०८ वाजता मोठ्या उत्साहात कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचे हस्ते तर नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील आवारात कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचे हस्ते तर नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन संपन्न झाले त्यावेळी अन्य मान्यवर दिसत आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,मुख्याधिकारी सुहास जगताप,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,धर्मशाला सुंदरडे,संदीप सोन्ने,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,सामाजिक वनीकरण अधिकारी निलेश रोडे,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,नगरसेवक मेहमूद सय्यद,बाळासाहेब रुईकर,मंदार पहाडे,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,आदीसह बहुसंख्येने नागरिक,पोलिस कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

   त्यावेळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी जनगणना करण्यासाठी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं असून त्यासाठी ऑनलाईन स्वगणना कशी करायची याची चित्रफित दाखवून उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तर दिले आहे.

आंदोलन स्थगित करण्यासाठी आयोजित बैठकीत आ.काळे यांचे समोर आरोप प्रत्यारोप करताना आंदोलक व उपअभियंता वर्षराज शिंदे.

दरम्यान त्यावेळी जुना टाकळी रोड (जिल्हा प्रमुख मार्ग क्रं.-९९) निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या रस्त्याव्या कामाबाबत तक्रार प्राप्त झाली होती.सदर निवेदनात दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार,कोपरगाव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर रस्त्याची मोजणी करून हद निश्चित करणे,माहिती फलक लावणे व इतर सुचना देण्यात आल्या होत्या.तरीही,सदर रस्त्याचे काम समाधानकारक रित्या होत नसून,निकृष्ट दर्जाची खडी वापरली जात असल्याचा आरोप मुर्शतपूर येथील कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी केला होता.

महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास सलामी देताना कोपरगाव शहर आणि तालुका पोलिस अधिकारी आणि कर्मचारी.

  शिवाय त्या रस्त्याचे योग्य मोजमाप न करता काम सुरू असल्याचे म्हणणे होते.या रस्त्यावरील पक्के व कच्चे अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार मागणी करूनही कार्यवाही झालेली नाही.या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ अर्जदाराने दिनांक १ मे रोजी तहसील कार्यालय,कोपरगाव समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.कार्यक्रम आटोपल्यावर आ.आशुतोष काळे यांनी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगावचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांची एकत्रित बैठक लावून सदर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने विजय जाधव यांनी आपले आंदोलन स्थगित केलं आहे.त्यावेळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे उपस्थित होते.

दरम्यान उपस्थितांचे स्वागत आणि आभार स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close