जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

…या ठिकाणी शिवपाणंद रस्ते जनजागृती अभियानाचा प्रारंभ!

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

         महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे कार्यकर्ते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेत रस्ते संदर्भात जनजागृती अभियानाचा नुकताच कोपरगाव तहसील आवारात शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव धट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कोपरगाव येथे जनजागृती अभियाना दरम्यान उपस्थित कार्यकर्ते.

“शेतरस्ते अडवणाऱ्यांवर सरकारने कडक पवित्रा घेतला असून बाधित शेतकऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण मिळणार आहे.शेत रस्ता अडवणे किंवा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने कडक पवित्रा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून याबाबत तालुकास्तरावर महसूल अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे”-शरद पवळे,कार्यकर्ते,शेतपाणंद रस्ते चळवळ.


   शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि माल नेण्यासाठी शिवपाणंद रस्ते अतिशय महत्त्वाचे आहेत.हे रस्ते मोकळे व सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृतीची गरज आहे,कारण त्यामुळे शेतकरी शेतीचा विकास करू शकतात आणि आपसातले वाद मिटू शकतात.शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कृषी उत्पादने आणि यंत्रे सहज नेता यावीत यासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” सुरू केली आहे.या योजनेंतर्गत यंत्रसामग्रीच्या साहाय्याने जलद गतीने पक्के बारमाही रस्ते बांधले जातात.शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध करून देणे,जेणेकरून शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल.या योजनेची अंमलबजावणी महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.यात प्रामुख्याने मुरूम किंवा खडीकरण करून रस्ते तयार केले जातात.मात्र याबाबत अद्याप शेतकऱ्यांत जागृती असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे याबाबत जनजागृतीसाठी शरद पवळे यांनी शेतकऱ्यांत जागृती सुरु केली आहे.ते रविवार दि.26 जुलै रोजी कोपरगाव येथे जनजागृती अभियान सकाळी 11 वाजता राबविण्यात आले आहे.त्यावेळी शेत पाणंद रस्त्यांचे चळवळ सुरू करणारे कार्यकर्ते शरद पवळे यांची उपस्थिती होती.

     यावेळी पवळे यांनी प्रलंबित रस्ते प्रकरण बाबत शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे तालुक्यात झिरो पेन्डन्सी अभियान राबवून एकही शेतकरी शेत रस्ता अभावी वंचित राहणार नाही याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेणे.शिवपाणंद रस्त्यांची हद्द निश्चित करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे माहिती धट यांनी दिली आहे.वैयक्तिक शेत रस्ते मिळणे बाबत अत्यंत अडचणी येत आहे.तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात अनेक खटले प्रलंबित आहेत या बाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासन सहकार्य करीत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

          या वेळी नारायण आभाळे,बाळासाहेब पाचोरे,उमेश माकुणे,विठ्ठलराव होन,संपत अलगट,सोपान कर्पे,संदीप मंचरे,संजय वाबळे,सुयोग गाढे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close