जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या शहरात ब्राह्मण सभेचा सोहळा उत्साहात

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव ब्राम्हण समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्याबरोबरच ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव आणि युवकांना इतिहासातून प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ब्राह्मण सभेने आयोजित ‘गुणगौरव, ब्रह्मजीवन गौरव,ब्रह्मगौरव व शिक्षक सन्मान सोहळा-२०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई या होत्या.

यावेळी ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे संस्थापक सचिव विनायकराव रसाळ यांचा ब्रह्मजीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तो क्षण.

दरम्यान यावेळी स्नेहल सारंग यांच्या ‘अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे.बाजीराव पेशव्यांचे शौर्य,नेतृत्व,दूरदृष्टी,संघर्ष आणि राष्ट्रकार्य यांचा जीवनपट त्यांनी प्रभावीपणे मांडला.त्यांच्या विवेचनातून उपस्थितांना,प्रेरणा मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

     ब्राह्मण समाजाची वर्तमान काळातील सामाजिक,आर्थिक आणि राजकीय उपेक्षा हा खरोखरच एक गंभीर आणि चिंतेचा विषय बनत चालला आहे.एरव्ही समृद्ध समजला जाणाऱ्या या समाजातील सर्वांचीच आर्थिक स्थिती उत्तम नाही.पौरोहित्य,शेती आणि अल्प पगारदार नोकऱ्यांवर जगणारा मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे.खुल्या प्रवर्गात असल्यामुळे गुणवत्ता असूनही तरुणांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागते.बदलत्या राजकीय समीकरणांमुळे मुख्य प्रवाहातील राजकारणात समाजाचे प्रतिनिधित्व आणि प्रभाव दिवसेंदिवस घटत चालला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आणि तालुक्यातील ब्राम्हण समाजाने आपल्या गुणवंताची कदर करत ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव आणि युवकांना इतिहासातून प्रेरणा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोपरगाव ब्राम्हण समाजातील गुणवंतांचा सन्मान आ.विवेक कोल्हे यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे तो क्षण.

  

"गुणवंत विद्यार्थी,शिक्षक व समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ही केवळ कौतुकाची बाब नसून त्यांच्या कार्याची दखल घेऊन इतरांना प्रेरणा देणारा उपक्रम असून समाजाने शिक्षण,संस्कार आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देत एकजुटीने पुढे जाण्याची गरज  आहे"- विवेक कोल्हे,आमदार विधानपरिषद.

  सदर कार्यक्रमास विधानपरिषद आ.विवेक कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,नासिक येथिल अँड.समीर जोशी,प्रविण कुलकर्णी,ब्राह्मण एकता मंचचे वैभव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे संस्थापक सचिव विनायकराव रसाळ यांचा ब्रह्मजीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ब्रह्मगौरव पुरस्काराने,गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्काराने आणि शिक्षकांचा शिक्षक सन्मानाने गौरव करण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी प्रसाद नाईक यांनी ज्येष्ठांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले.ज्येष्ठांच्या अनुभवातून आणि गुणवंतांच्या कर्तृत्वातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभे अध्यक्ष मकरंद को-हाळकर,उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी,सचिव सचिन महाजन,सहसचिव संदीप देशपांडे,संघटक महेंद्र कुलकर्णी,गौरीष लव्हरीकर,खजिनदार जयेश बडवे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी,मिलिंद धारणगांवकर,वसंतराव ठोंबरे,सदाशिव धारणगांवकर,संजीव देशपांडे,अजिंक्य पदे,अनिल कुलकर्णी,अँड.श्रद्धा जवाद,वंदना चिकटे आदींनी परिश्रम घेतले आहे.
   
   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश बडवे यांनी केले,तर उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close