गुन्हे विषयक
दुचाकी अपघातात एक ठार,एक जखमी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी-डाऊच रोडवर घारी शिवारात झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात अशोक जगन्नाथ रक्ताटे (वय -62 वर्षे) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले असून आणखी एक महिला जखमी झाली असल्याची दुर्दैवी घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात मयत अशोक रक्ताटे यांचे विरुद्ध फिर्यादी महेश बाळासाहेब काटकर (वय – 29 वर्षे) रा.घारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेतील मयत आरोपी अशोक रक्ताटे हे त्याच्या ताब्यातील वहान बजाज कंपनीचा प्लॅटीना मॉडेलची दुचाकी (क्रमांक एम.एच.-17-वाय-8871) हे रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन अंधारात रोडवरील खड्डा चुकवित असताना रोडचा अंदाज न आल्याने चुकीच्या बाजूला येवुन फिर्यादी यांच्या वडीलाच्या मोटार सायकलला वहान होंडा कंपणीची सीडी डॉन दुचाकी (क्रं.-एम.एच.-15-क्यू.-2047) ला जोराची धडक देवुन आरोपी अशोक रक्ताटे यांच्या मागे बसलेले भाऊ व बहीण यांच्या कमीअधिक दुखापतीस व स्वःताच्या मुत्युस कारणीभुत झाला आहे.
कोपरगाव तालुक्यात रस्त्यांची व दुरावस्था हा काही नवा विषय नाही त्यामुळे अनेक नागरिकांचे आणि प्रवाशांचे बळी जात आहे.यात वाहनाचे नुकसान हा संशोधनाचा विषय ठरावा असा गंभीर आहे.त्यातून रस्त्यांची साडेसाती संपण्याची काही चिन्हे दिसून येत नाही.अशीच एक घटना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07 वाजेच्या सुमारास घडली असून यातील मयत आरोपी अशोक रक्ताटे हे त्याच्या ताब्यातील वहान बजाज कंपनीचा प्लॅटीना मॉडेलची दुचाकी (क्रमांक एम.एच.-17-वाय-8871) हे रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन अंधारात रोडवरील खड्डा चुकवित असताना रोडचा अंदाज न आल्याने चुकीच्या बाजूला येवुन फिर्यादी यांच्या वडीलाच्या मोटार सायकलला वहान होंडा कंपणीची सीडी डॉन दुचाकी (क्रं.-एम.एच.-15-क्यू.-2047) ला जोराची धडक देवुन आरोपी अशोक रक्ताटे यांच्या मागे बसलेले भाऊ व बहीण यांच्या कमीअधिक दुखापतीस व स्वःताच्या मुत्युस कारणीभुत झाला असल्याचे काल दुपारी 2.42 वाजता दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.यात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 505 / 2026 भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 106(1),324 (4),मोटार वाहन कायदा कलम 134 (ए)(बी), 177 प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहेत.


