शैक्षणिक
…या संस्थेच्या प्राध्यापकांची इंटरनॅशनल पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपमध्ये निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज आणि संजीवनी विद्यापिठाच्या चार प्राध्यापकांनी इंटरनॅशनल पोस्ट डाॅक्टरेट रिसर्च फेलोशीप पूर्ण केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबद्दल या प्राध्यापकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

” संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज आ संजीवनी विद्यापिठाच्या चार प्राध्यापकांनी इंटरनॅशनल पोस्ट डाॅक्टरेट रिसर्च फेलोशीप पूर्ण केली. त्यामुळे संजीवनीच्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाला अधिक बळ मिळेल.या चारही प्राध्यापकांचे यश म्हणजे संजीवनीची शैक्षणिक गुणवत्ता,संशोधन संस्कृती आणि जागतिक स्तरावर वाटचाल करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे”-अमित कोल्हे,कुलगुरू,संजीवनी विद्यापीठ.
संजीवनीचे प्राध्यापक डॉ.एस.आर.देशमुख, डॉ.ए.व्ही.ब्राह्मणे आणि डॉ.एम.व्ही.कुलकर्णी यांनी सिंगापूरचे प्रसिध्द सरकारी विद्यापीठ ‘सिंगापुर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी’ येथून पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पूर्ण केली.तर डॉ एम.बी.गवळी यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअर’ येथून ही फेलोशिप पूर्ण केली आहे.

याबाबत माहिती देताना संजीवनी विद्यापीठाचे कुलगुरू अमित कोल्हे म्हणाले, पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप ही पी.एच.डी. पदवीनंतर संशोधन क्षेत्रात अधिक उच्चस्तरीय प्रावीण्य मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी असते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव त्यातून मिळतो.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत संशोधन विषयक सहकार्य,संयुक्त संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधनपत्रे आणि पेटंट निर्मितीला त्यातून चालना मिळते.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी या प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी संजीवनी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.ए.जी.ठाकूर,रजिस्ट्रार डॉ.अमोल ढाकणे, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ.ए.बी.पवार आणि स्थापत्य व संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ए.एस.सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.



