निधन वार्ता
माजी जि.प.सदस्य रोहमारे यांचे निधन!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व पोहेगाव येथील प्रगतशील शेतकरी साईनाथ किसन रोहमारे (वय-72 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,तीन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचेवर पोहेगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.साईनाथ रोहमारे यांची साधी रहाणी,विनम्र सवभाव,सर्वांना घेऊन बरोबर चालण्याची वृत्ती त्यांना सर्वसमावेशक बनवत होती.त्यामुळे त्यांना पोहेगाव आणि परिसरात मोठी लोकप्रियता लाभली होती.त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात अनेक विकासोन्मुख कामे राबवली होती.या परिसरात ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.त्यांच्या अजातशत्रू स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांना विरोधकांनी सन्मान दिला होता.त्याचा फायदा माजी मंत्री कोल्हे यांना पोहेगाव आणि परिसरातील अनेक राजकीय वाद मिटविण्यासाठी होत असे.
स्व.साईनाथ रोहमारे यांची साधी रहाणी,विनम्र सवभाव,सर्वांना घेऊन बरोबर चालण्याची वृत्ती त्यांना सर्वसमावेशक बनवत होती.त्यामुळे त्यांना पोहेगाव आणि परिसरात मोठी लोकप्रियता लाभली होती.त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात अनेक विकासोन्मुख कामे राबवली होती.या परिसरात ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.त्याचाच त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळण्यात उपयोग झाला होता.त्यानंतर त्यांना अडीच वर्षे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि उपाध्यक्षपदाची संधी माजी मंत्री कोल्हे यांनी उपलब्ध करून दिली होती.त्यांच्या अजातशत्रू स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांना विरोधकांनी सन्मान दिला होता.त्याचा फायदा माजी मंत्री कोल्हे यांना पोहेगाव आणि परिसरातील अनेक राजकीय वाद मिटविण्यासाठी होत असे.ते जिल्ह्याचे तत्कालीन नेते आणि माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांचे पुतणे होते.त्यामुळे कदाचित माजी मंत्री कोल्हे यांनी माजी आ.रोहमारे यांना राजकीय शह देण्यासाठी वापर करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.मात्र त्यांनी याबाबत कधीही गैरवापर करत आपल्या स्वभावात बदल होऊ दिला नाही.आणि ते त्यांचे शक्तिस्थळ मानले जात होते.त्यांचे पिताश्री किसन दादा रोहमारे यांचे निधनानंतर त्यांचे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांचेवर पडली होती.त्यांना सामान्य जनात मोठी किंमत होती.दीन दुबळ्यांना विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना नेहमी मदतीचा हात दिला होता.त्यामुळे परिसरात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते.त्यांचे राजकीय संबंधांचे रूपांतर नंतर माजी मंत्री कोल्हे कुटुंबाशी नात्यात रुपांतरित झाले होते.
त्यांचे अंत्यविधीसाठी संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,आ.विवेक कोल्हे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक रोहम,संजीवनी कारखान्याचे अनेक संचालक,कार्यकर्ते,बाजार समितीचे माजी संचालक रमेश औताडे आदीसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पश्चात भाऊ चंद्रकांत रोहमारे,पुणे येथे कार्यरत असलेले अभियंते मुले सचिन रोहमारे,नितीन रोहमारे,समीर रोहमारे आदी परिवार आहे.ते कोपरगाव तालुका एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांचे चुलत बंधू होते.

