शैक्षणिक
…या शाळेचे विद्यार्थी स्थलांतरित,पालकांत समाधान!

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा करून लाखो रुपये खर्चाच्या शाळा खोल्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे लवकरच उद्घाटन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या सरपंच सारिका विजय थोरात यांनी दिली आहे.

दरम्यान शाळा खोल्यांचे आतील काम,रंगरंगोटी,विद्युतिकरण लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आले असून आज विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आज बाकडे आत टाकून विद्यार्थी स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सारिका थोरात यांना मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड,शाळा समिती अध्यक्ष सूर्यभान थोरात यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दीड वर्षापूर्वी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व ज्येष्ठ कार्यकर्ते एस. के.थोरात यांच्या सहकार्याने जुन्या शाळा खोल्यांचे अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडे निर्लेखन करून सातत्याने पाठपुरावा करून ते मंजूर करण्यात आले होते.त्यानंतर नवीन इमारतीसाठी शिर्डीचे नवनियुक्त खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मदतीने जिल्हा नियोजन आराखड्यात तरतूद करून प्रथम एक व नंतर दोन अशा तीन वर्ग खोल्या व एक अंगणवाडी इमारत खोल्या लागोपाठ मंजूर करण्यात आल्या होत्या.त्यांचे भूमिपूजन खा.वाकचौरे यांचे शुभहस्ते गत नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले होते.त्यावेळी निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण होत असून त्यांचे किरकोळ काम अद्याप पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर त्यांनी आज ही माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान शाळा खोल्यांचे काम पूर्ण होण्यास
बऱ्याच अडचणी आल्या असल्या तरी ग्रामपंचायतीने त्यावर मात करत ते अंतिम टप्प्यात आणले आहे.दरम्यान या काळात पर्यायी वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांची काही अंशी गैरसोय झाली होती.मात्र मच्छिंद्र थोरात,गणेश थोरात,गणेश काळोखे आदींनी दाखविलेल्या उदार अंतःकरणाने मदत केली होती.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान सदर इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी मार्गदर्शक व ज्येष्ठ कार्यकर्ते,सरपंच यांचेकडे सातत्याने केली होती.ती लवकरच पूर्ण होत असून अद्याप काही कामे व इमारत विस्तार होणे बाकी असून त्याबाबत कार्यकर्ते पाठपुरावा करत आहे.लवकरच त्याला यश मिळेल असा आशावाद सरपंच सारिका थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या कामाबाबत मार्गदर्शक नानासाहेब जवरे,एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र थोरात गोरक्षनाथ थोरात,गोरक्षनाथ थोरात,विश्वनाथ थोरात,नवनाथ थोरात,गोरक्षनाथ शिंदे,उत्तमराव थोरात,अशोक शिंदे,चंद्रकांत थोरात,रामनाथ थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,शाळा समिती सदस्य अरुण थोरात,गणेश थोरात,बबन शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.



