निधन वार्ता
जयचंद काले यांचे निधन !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव रूपेंद्र काले यांचे जेष्ठ बंधू आणि शेतकरी संघटनेचे सहाय्यक व गणेशनगर परिसरात नामांकित असलेल्या वर्धमान सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष जयचंद काले (वय -67) यांचे नुकतेच अकाली निधन झालं आहे.त्यांच्या पश्चात आई,तीन भाऊ,पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.त्यांचेवर श्रीरामपूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.जयचंद काले हे अत्यंत विनम्र सवभाव,सर्वांना घेऊन बरोबर चालण्याची वृत्ती त्यांना सर्वसमावेशक बनवत होती.त्यांचे व्यक्तिमत्व अजातशत्रू होते.त्यामुळे यांचेकडे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांचा राबता राहत असत.त्यामुळे त्यांना गणेशनगर,कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,सगमनेर,नेवासा आणि परिसरात मोठी लोकप्रियता लाभली होती.त्यांचे वडील विजयचंद काले यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर त्यांचेवर कुटुंबाची सर्व जबाबदारी आली होती.मात्र त्यांनी ती आपल्या नम्र स्वभावामुळे लीलया पेलली होती.त्यांनी सहकारी पतसंस्था आणि किराणा व्यवसायातून यांनी मोठे नाव कमावले होते.
स्व.जयचंद काले हे अत्यंत विनम्र सवभाव,सर्वांना घेऊन बरोबर चालण्याची वृत्ती त्यांना सर्वसमावेशक बनवत होती.त्यांचे व्यक्तिमत्व अजातशत्रू होते.त्यामुळे यांचेकडे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांचा राबता राहत असत.त्यामुळे त्यांना गणेशनगर,कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,सगमनेर,नेवासा आणि परिसरात मोठी लोकप्रियता लाभली होती.त्यांचे वडील विजयचंद काले यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर त्यांचेवर कुटुंबाची सर्व जबाबदारी आली होती.मात्र त्यांनी ती आपल्या नम्र स्वभावामुळे लीलया पेलली होती.त्यांनी किराणा व्यवसायातून यांनी मोठे नाव कमावले होते.त्यानंतर त्यांनी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली होती.सदर संस्थेच्या उभारणीत यांचा सिंहांचा वाटा होता.त्यांचे घराणे हे चळवळीशी संबंधित असल्याने त्यांचेकडे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची कायम वर्दळ असतानाही त्यांनी या आपल्या सेवेत कधी खंड पडू दिला नाही.रूपेंद्र काले यांनी सुरू केलेल्या संकेत नर्सरी ला त्यांनी कायम प्रोत्साहन दिले होते.त्यामुळे या नर्सरीचे नाव राज्यभर आणि परराज्यात परिचित होण्यात मोठी मदत मिळाली होती.त्यांनी आपले भाऊ आणि मुले पुतणे यांच्या उच्च शिक्षणात मोठा हातभार लावला होता.त्यांच्या निधनाने शेतकरी संघटना आणि सहकार चळवळीला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.त्यांचे बंधू रूपेंद्र काले,कैलास काले,आनंद काले या भावंडांचा सामाजिक चळवळीत आणि दुःख हरण करणाऱ्या नामांकित व्यक्तीत समावेश होत होता.त्यातील ज्येष्ठ बंधू जयचंद काले आज हयात नाही यावर विश्वास बसणे कठीण होत आहे.
त्यांच्या निधनाबद्दल शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खा.प्रसाद तनपुरे,सिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,जिल्हाप्रमुख अनिल औताडे,विठ्ठल शेळके,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,रमेश दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,तानाजी शिंदे,भाऊसाहेब सोनवणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.


