निधन वार्ता
सेवानिवृत्त शिक्षक वालझाडे यांचे निधन!

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जुन्या पिढीतील शिक्षक रामभाऊ रंगनाथ वालझाडे,गुरुजी (वय -८० वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.रामभाऊ वालझाडे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात आपली सेवा चोख बजावली होती.त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या होत्या.त्यांचा कडक स्वभावामुळे विद्यार्थ्यांत आदरयुक्त धाक होता.त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक शैक्षणिक मोहरा समाजाने गमावला असल्याचे मानले जात आहे.
स्व.रामभाऊ वालझाडे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात आपली सेवा चोख बजावली होती.त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या होत्या.त्यांचा कडक स्वभावामुळे विद्यार्थ्यांत आदरयुक्त धाक होता.त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक शैक्षणिक मोहरा समाजाने गमावला असल्याचे मानले जात आहे.त्यांच्यावर उद्या सकाळी १० वाजता संवत्सर येथील गोदातीरी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.ते कृष्ण वालझाडे व दिपक वालझाडे यांचे पिताश्री होते.


