नाशिक
साखर कारखान्यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका,३ डिसेंबरला सुनावणी?

न्यूजसेवा
कोपरगाव -( नानासाहेब जवरे)
राज्यभरातील व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि साखर कारखान्यांच्या मनमानीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक जनहित याचिकेवर गुरुवारी ३ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.न्या.एन. बी.सूर्यवंशी आणि न्या.ए.डी.शिंदे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.त्यामुळे साखर कारखानदारात खळबळ उडाली आहे.
राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखानदार मालक असलेल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवत आणून स्वतःच सरकारचा पायंडा मोडत शेतकऱ्यांची ऊस दराबाबत उसासारखी प्रचंड पिळवणूक करत आहे.या अन्यायाविरुद्ध शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा ॲड.अजित काळे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.या याचिकेत केवळ साखर कारखान्यांच्या मनमानीवरच आक्षेप घेतलेला नाही,तर राज्य सरकारने कायद्याने बंधनकारक असलेल्या ‘ऊस नियंत्रण मंडळा’ची स्थापनाच का केली नाही,या गंभीर प्रश्नावरही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन ०४ हजार २०० रुपये आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये ०३ हजार ५०० ते ०३ हजार ९०० रुपये पहिली उचल दिली जात असताना नगर व सोलापूरमधील शेतकऱ्यांना कमी दर दिला जात असल्याने हा संघर्ष तीव्र झाला आहे.याला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून वाचा फोडली आहे.
सदर प्रकरण आता गुरुवारी ०३ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे या याचिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.या याचिकेबाबत शिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी जोरदार स्वागत केले आहे.
साखर कारखान्यांना स्वतःच दर जाहीर करण्याचा अधिकार नाही
या याचिकेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखर कारखान्यांना स्वतःच्या मर्जीने ऊसाचा दर जाहीर करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. विधिज्ञ अजित काळे यांनी न्यायालयात मांडणी केली की, “महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम, २०१३ च्या कलम ३ नुसार राज्य सरकारने ‘ऊस नियंत्रण मंडळ’ स्थापन करणे बंधनकारक आहे. या मंडळाने कलम ४(अ) अंतर्गत ७०:३० फायदा वाटपाच्या रंगराजन समितीच्या सूत्रानुसार ऊसाचा अंतिम दर ठरवायचा असतो. मात्र, मंडळच अस्तित्वात नसल्यामुळे साखर कारखाने हक्काचा भंग करत स्वतःच दर जाहीर करत आहेत. ही थेट कायद्याची पायमल्ली आहे.

केंद्र सरकारने २०२६-२७ या गाळप हंगामासाठी ऊसाचा एफ.आर.पी.०३,६५० रुपये प्रति टन जाहीर केला आहे. मात्र,अहिल्यानगरमधील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (०३ हजार २०० रु.), अशोक सहकारी साखर कारखाना (०३ हजार १५० रु.) आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना (०३ हजार २०० रु.) या व इतर साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.पेक्षा कमी दर जाहीर करून कायद्याचे उघड उल्लंघन केले आहे.जेव्हा केंद्र सरकारनेच किमान दर ०३ हजार ६५० रुपये निश्चित केला आहे,तेव्हा कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची थट्टा ठरली असल्याची शेतकऱ्यांत मोठी चर्चा आणि असंतोष निर्माण झाला होता.त्याला शेतकरी संघटनेने वाचा फोडल्याने राज्यभर या याचिकेचे जोरदार स्वागत होत आहे.
एफ.आर.पी.पेक्षाही कमी दर ही शेतकऱ्यांची उघड लूट आहे”-ॲड.अजित काळे.
केंद्र सरकारने २०२६-२७ या गाळप हंगामासाठी ऊसाचा एफ.आर.पी.०३,६५० रुपये प्रति टन जाहीर केला आहे. मात्र,अहिल्यानगरमधील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (०३ हजार २०० रु.), अशोक सहकारी साखर कारखाना (०३ हजार १५० रु.) आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना (०३ हजार २०० रु.) या व इतर साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.पेक्षा कमी दर जाहीर करून कायद्याचे उघड उल्लंघन केले आहे.जेव्हा केंद्र सरकारनेच किमान दर ०३ हजार ६५० रुपये निश्चित केला आहे,तेव्हा कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची थट्टा करण्यासारखे असल्याचे याचिकेत म्हटले आहे. कारण आहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व कारखाने हे मोठ्या प्रमाणात उपपदार्थांची निर्मिती करतात.

“केंद्र सरकारने जाहीर केलेला एफ.आर.पी.हा किमान दर आहे.राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करून शेतकऱ्यांना ४ हजार ५०० रुपये प्रति टन दराने पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यानंतर ७०:३० च्या सूत्रानुसार अंतिम हिशोब देणे कायद्याने बंधनकारक आहे.मात्र,प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन प्रशासनास निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करावे”-रूपेंद्र काले,सचिव,शेतकरी संघटना.
शेतकऱ्यांची ०४ हजार ५०० पहिला हप्ता व ७०/ ३० च्या फॉर्मुला प्रमाणे उपपदार्थाची मागणी कशी न्याय्य आहे?
शेतकऱ्यांनी प्रति टन ७,५०० रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे,जी पूर्णपणे वैज्ञानिक आणि आर्थिकदृष्ट्या न्याय्य असल्याचे याचिकेत स्पष्ट केले आहे.
याचिकेत पुण्यातील केंद्रीय ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव यांच्या अधिकृत अहवालाचा दाखला देत सांगण्यात आले आहे की, सीओ ८६०३२ (सी.ओ.-८६०३२) या ऊसाच्या प्रजातीपासून १३.६९% ते १५.७५% पर्यंत साखर उतारा मिळतो.याचा अर्थ एक टन उसापासून १३६.९ किलो साखर तयार होते.सध्याचा साखरेचा दर अगदी कमी धरून ५५ रुपये किलो धरला तरी एका टन उसापासून ७,५२९ रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते.शिवाय इथेनॉल,बगॅस आणि मोलॅसेस या उपपदार्थांपासून कारखान्यांना प्रचंड नफा होतो.त्यामुळे,कारखान्यांना दिलासा देण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पहिला हप्ता म्हणून ४,५०० रुपये प्रति टन आणि एकूण ७०/३० प्रमाणे अंतिम भाव प्रति टन दर मिळणे हे पूर्णपणे न्याय्य असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

तोडणी आणि वाहतूक खर्चाची मनमानी कपात:
याचिकेत पुढे नमूद केले आहे की,”कापणी व वाहतूक खर्चाची कपात ही कायद्यातील २०१६ चे नियम ८(२)(इ) आणि २१ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ‘दोन्हीपैकी जे कमी असेल’ तेच आकारायचे असताना, कारखाने मनमानी पद्धतीने वाढीव कपात करत आहेत. त्यामुळे जास्त अंतरावरून (२५ किमी पेक्षा जास्त) ऊस आणला जात असला तरीही शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
कारखानदारांकडून साखर विक्रीत पारदर्शकतेचा अभाव:
साखर कारखाने साखरेचा लिलाव किंवा विक्री ही पारदर्शक पद्धतीने करत नाहीत.त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती न देता,बंद खोलीत सौदे केल्यास शेतकऱ्यांना ७०% नफ्याचा योग्य व त्यांच्या हक्काचा फायदा मिळत नाही.त्यामुळे कारखान्यांनी आपल्या वेबसाइटवर आणि साखर आयुक्तांच्या वेबसाइटवर साखर विक्रीच्या निविदा प्रसिद्ध करणे बंधनकारक करावे,अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
तातडीने हस्तक्षेपाची विनंती
दरम्यान,या प्रकरणी माहिती देताना ॲड.अजित काळे यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने जाहीर केलेला एफ.आर.पी.हा किमान दर आहे.राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करून शेतकऱ्यांना ४ हजार ५०० रुपये प्रति टन दराने पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यानंतर ७०:३० च्या सूत्रानुसार अंतिम हिशोब देणे कायद्याने बंधनकारक आहे.मात्र,प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन प्रशासनास निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करावे,अशी आम्हाला अपेक्षा आहे.
