कला व सांस्कृतिक विभाग
…या लघुपटाला चित्रपट महोत्सवात द्वितीय क्रमांक

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या शिकवणुकीस अनुसरून श्री साईबाबा संस्थानच्या विविध सेवाकार्याचा आढावा घेणाऱ्या तसेच भाविकांची श्रद्धा आणि मंदिरातील विविध घडामोडींचे प्रभावी चित्रण करणाऱ्या ‘24 हॉवर्स इन्साइड द टेंमल शिर्डी ’ या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जयपुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व आर्यण राज फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजीत आर्यन इंटर नॅशनल चिल्ड्रन फिल्म फेस्टीव्हल(ए.आय.सी.एफ.एफ. 2026 मध्ये या लघुपटाला ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आले असून,शॉर्ट डॉक्युमेंटरी या विभागात द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.

“श्री साईबाबांच्या पवित्र मंदिरातील आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाचे तसेच संस्थानच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध सेवाकार्याचे प्रभावी चित्रण करणाऱ्या ‘24 हॉवर्स इन्साइड द टेंमल शिर्डी ’ या लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला सन्मान ही श्री साईबाबा संस्थान व शिर्डीसाठी अभिमानाची बाब आहे.शिर्डीतील साईभक्ती,मंदिराची परंपरा आणि येथील वैशिष्ट्यपूर्ण वातावरण चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे,ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे”- गोरक्ष गाडीलकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
हर्ष पांड्या व शेखर झा यांनी तयार केलेल्या या लघुपटातून श्री साईबाबांच्या मंदिरातील चोवीस तासांत प्रशासनामार्फत केले जाणारे भक्ताभिमुख कार्ये,भाविकांची श्रद्धा,मंदिरातील धार्मिक विधी व परंपरा,संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेले विविध सेवाकार्य तसेच दिवसभरातील विविध क्षणांचे वास्तवदर्शी आणि प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.शिर्डीच्या आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले,“श्री साईबाबांच्या पवित्र मंदिरातील आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाचे तसेच संस्थानच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध सेवाकार्याचे प्रभावी चित्रण करणाऱ्या ‘24 हॉवर्स इन्साइड द टेंमल शिर्डी ’ या लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला सन्मान ही श्री साईबाबा संस्थान व शिर्डीसाठी अभिमानाची बाब आहे.शिर्डीतील साईभक्ती,मंदिराची परंपरा आणि येथील वैशिष्ट्यपूर्ण वातावरण चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे,ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.” यावेळी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे श्री साईबाबा संस्थानचे वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.



