अभिष्टचिंतन कार्यक्रम
कोपरगावच्या राजकीय आसमंतातील नवीन वलय !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संचालक तथा गोदावरी-नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव, राहाता तालुक्यातील कार्यकर्ते,दूध उत्पादक,नागरिकांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करून व वस्तूरूपाने शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली असल्याचे आढळून आले आहे.राजेश परजणे यांना टाळून कोपरगावच्या राजकीय आसमंतात पुढे जाणे आता अवघड असल्याचे मानले जात आहे.

सहकारी दुध धंद्यात आज खाजगी दूध उत्पादक संघांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे.त्यात अनेकांनी आपले चंबुगबाळ कधीच गुंडाळले आहे.मात्र गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघ आज राजेश परजणे यांच्या नेतृत्वात मांडी थोपटून उभा असल्याचे दिसत आहे.किंबहुना कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांना अनेक वर्षे प्रयत्न करूनही त्यांना पर्याय उभा करता आलेला नाही हे विशेष ! त्यात अध्यक्ष राजेश परजणे यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.त्यांनी तालुक्यात अनेक विश्वासू सहकारी निर्माण केले आहे.त्यांच्या साथीने त्यांनी आपले दूध व्यवसायाची नौका पैलतीराला नेली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.आता त्यांनी आपल्या राजकीय प्रभावक्षेत्रात नुसते पाय रोवले नाही तर ते प्रस्थापितांना आता आव्हान देऊ पाहत असल्याचे अनेक कार्यक्रमात दिसून येत आहे.त्याचा धाक प्रस्थापित वर्तुळात घेतला जात आहे.
राजेश परजणे यांनी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व स्व.नामदेवराव परजणे यांच्या २० जून २००४ च्या निधनानंतर दूध संघाची जबाबदारी त्यांनी गेली २२ वर्षे यशस्वीपणे पार पाडली आहे.तो कालखंड प्रतिकूल मानला जात होता.माजी मंत्री कोल्हे आणि परजणे गटात टोकाचे वैमनस्य होते.१९९७-९८ मध्ये त्यांचे एकमेकावर शंभरावर गुन्हे दाखल झालेले होते.दूध संकलनावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला होता.तर दुसरीकडे राजेश परजणे यांना आपले राजकीय वलय स्व.नामदेवराव परजणे यांच्यानंतर पुन्हा निर्माण करायचे आव्हान होते.ते त्यांनी यशस्वीपणे पेलल्याचे कालोघाने उघड झाले आहे.गावोगाव जाऊन बैठका घेऊन त्यांनी दूध उत्पादकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे.परिणामस्वरूप आज त्यांनी पाय रोवून कोपरगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांत आपले बस्तान बसवले आहे.राजकारणात त्यांनी आपला तिसरा कोण आणि त्याचे अस्तित्व विविध निवडणुकात दाखवून दिले आहे.आज कोपरगाव तालुक्यात ते पूर्णपणे स्वबळावर विजयी होऊ शकत नसले तरी कोणाला धूळ चारायची याचे गणित त्यांनी जुळविले आहे.आणि वर्तमान राजकारणात ही यशाची पहिली पायरी मानली जाते.तुम्ही विजयी होऊ शकत नसला तरी कोणाला पराभवाचे तोंड पाहायला भाग पाडायचे याचे एकदा गणित जुळले की पुढची राजकीय वाट आपोआप तयार होते याचा कोपरगाव तालुका साक्षीदार आहे.

सहकारी दुध धंद्यात आज खाजगी दूध उत्पादक संघांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे.त्यात अनेकांनी आपले चंबुगबाळ कधीच गुंडाळले आहे.भेसळीचे राज्यात २० लाख लिटर दूध कमी होऊन दूध उत्पादकांच्या दरात वाढ झाली आहे.मात्र या स्पर्धेत गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघ आज मांडी थोपटून उभा असल्याचे दिसत आहे.किंबहुना कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांना अनेक वर्षे प्रयत्न करूनही त्यांना पर्याय उभा करता आलेला नाही हे विशेष ! त्यात अध्यक्ष राजेश परजणे यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.त्यांनी तालुक्यात अनेक विश्वासू सहकारी निर्माण केले आहे.त्यांच्या साथीने त्यांनी आपले दूध व्यवसायाची नौका पैलतीराला नेली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.आता त्यांनी आपल्या राजकीय प्रभावक्षेत्रात नुसते पाय रोवले नाही तर ते प्रस्थापितांना आता आव्हान देऊ पाहत असल्याचे अनेक कार्यक्रमात दिसून येत आहे.त्याचा धाक प्रस्थापित वर्तुळात घेतला जात आहे.त्यामुळे त्यांना टाळून कोपरगावच्या राजकीय वर्तुळात पुढे जाणे आता त्यांना अवघड नाही तर जवळपास अशक्य बनले असल्याचे मानले जात आहे.त्यांनी तालुक्यातील राजकीय वर्तुळात जसे स्वतःचे वलय निर्माण केले आहे.तसे त्यांनी संवत्सर ग्रामपंचायत येथील कार्यक्षेत्रात अनेक विकासकामे करून स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला आहे.त्याचे अनेक कामे साक्ष देत आज उभी आहेत.त्यात जलसंधारण,विविध शासकीय इमारती,त्यात जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे,ग्रामपंचायत इमारत,शाळा,अंगणवाडी इमारत,विविध शासकीय कार्यालये आदी इमारती त्यांची साक्ष देत उभी आहेत.जिल्हा परिषद शाळा तर आज राज्यात पहिल्या क्रमांकावर येण्याची आणि राज्यस्तरीय स्पर्धेत असल्याचे मानले जात आहे.संवत्सर आणि परिसरातील रस्ते,पाणी योजना,वैयक्तिक योजना त्यात आघाडीवर आहे.आगामी काळात त्यांचे राजकीय वलय आणखी बहरत जाईल यात कोणतीही शंका वाटत नाही. त्यांना त्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे आदींसह बंधू कृष्णा परजणे,माजी उपसरपंच विवेक परजणे,तालुक्यातील जीवास जीव देणारे विश्वासू कार्यकर्ते आदींचे सहकार्य लाभत आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी ‘न्यूजसेवा’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा !



