न्यायिक वृत्त
…’त्या’ गुन्ह्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सुमारे 80 हजार रुपयांच्या गुटखा प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी योगेश विजय कटाळे व सागर जयराम ताकवले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यास न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्र व जामीन बंध पत्रावर जामीन देताना अटी घातल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर सागर ताकवले याचेवर रुपये ३० हजारांच्या वैयक्तिक बंधपत्र व जामीन बंध पत्रावर जामीन देताना अटी घातल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान याच गुन्ह्यातील आरोपी सागर तकवले यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.कोपरगाव दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.-743/2026 मधील आरोपी सागर जयराम तकवले यांचा नियमित जामीन अर्ज (फौजदारी जामीन अर्ज क्र. 277/2026) मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांनी मंजूर केला आहे.जिल्हा आणि सत्र न्यायालयाने रुपये ३० हजारांच्या वैयक्तिक बंधपत्र व जामीन बंध पत्रावर जामीन देताना अटी घातल्या आहेत.
कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोडवरील बाबा चौक (गिरमे सिटी-श्रीनगर परिसर) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असल्याचे उघड झाले होते.यातील मोपेडवरून गुटखा विक्रीसाठी येणाऱ्या सागर जयराम ताकवले (वय-२९) रा.सुभाषनगर,कोपरगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर गुटखा पुरवठादार योगेश विजय कटाळे हा फरार झाला होता.दरम्यान या कारवाईत पोलिसांनी या कारवाईत प्रतिबंधित गुटखा,सुगंधित पानमसाला,तंबाखू आणि दुचाकी असा एकूण ७९ हजार ८७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता यामुळे कोपरगाव आणि नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत रहिवासी असलेला आरोपी आरोपी योगेश विजय कटाळे यांचेवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दि.२७ नोव्हेंबर २०२६ रोजी अवैध गुटखा बाळगल्या प्रकरणी गुन्हा रजि.क्र.-743/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या बाबत कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात फौजदारी जमिनीसाठी अर्ज क्र. 276/2026 दखल करण्यात आला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली आहे.त्यात कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी मंजूर केला आहे.त्यानुसार कायमस्वरूपी पत्ता व ओळखपत्राची कागदपत्रे सादर करणे,तपासात अडथळा न आणणे आणि तपास अधिकाऱ्यांसमोर दर पर्यायी सोमवारी हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.दरम्यान या गुन्ह्यात आरोपीच्या वतीने ॲड.जयंत आत्माराम जोशी यांनी बाजू मांडली होती.तर त्यांना ॲड.शिवम मोरे व ॲड.सुरेंद्र जाधव यांनी सहकार्य केले होते.
दरम्यान याच गुन्ह्यातील आरोपी सागर तकवले यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.कोपरगाव दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.-743/2026 मधील आरोपी सागर जयराम तकवले यांचा नियमित जामीन अर्ज (फौजदारी जामीन अर्ज क्र. 277/2026) मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांनी मंजूर केला आहे.जिल्हा आणि सत्र न्यायालयाने रुपये ३० हजारांच्या वैयक्तिक बंधपत्र व जामीन बंध पत्रावर जामीन देताना अटी घातल्या आहेत.त्यानुसार कायमस्वरूपी पत्ता व मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना देणे,दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणे आणि साक्षीदारांना धमकावणे किंवा प्रलोभन देणे टाळणे बंधनकारक आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीच्या वतीने ॲड.जयंत जोशी यांनी बाजू मांडली.त्यांना ॲड.शिवम मोरे व ॲड.सुरेंद्र जाधव यांनी सहकार्य केले आहे.या गुन्ह्यातील सुनावणीसाठी कोपरगाव सह नगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.



