जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

..’त्या’ दुहेरी खुनातील आरोपिंना आठ दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या आपेगाव ग्रामपंचायत हद्दीत पूर्वेस गावापासून सोमवार दि.३० मे रात्रीच्या सुमारास रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी राधाबाई भुजाडे हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना पढेगाव व हिंगणी येथील तीन सराईत आरोपींनीं त्यांचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली होती.त्यातील आरोपीना कोपरगाव तालुका पोलिसांनी श्रीरामपूर येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

या गंभीर गुंह्यातील आरोपी अजय छंदू काळे,(वय-१९) तर दुसरा हिंगणी येथील अमित कागद चव्हाण (वय-२०),तर जंतेश छंदु काळे (वय-२२) अशा तिघांनी हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्यात आरोपीनी वापरलेली मात्र विहिरीत कडेलोट केलेली दुचाकी,चोरून नेलेला सोने,नाणे,रोख रक्कम असा ऐवज जप्त केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”दोन दिवस होऊनही आपले आईवडील आपला फोन उचलत नाही म्हणून त्याच्या पुणे स्थित नोकरीस असलेल्या मुलांना शंका आली होती.म्हणून त्यांनी आपले चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन लावला होता व आपले आई आणि वडील फोन उचलत नाही म्हणून आपल्या चुलत भावास घरी पाठवून त्याचा तपस करण्यास पाठवले असता ते घराच्या छतावर मृत अवस्थेत आढळून आले होते.

दरम्यान या ठिकाणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून या प्रकरणी पुणे स्थित मयताची मुले आल्यावर या प्रकरणी गेलेल्या मुद्दे मालाची चौकशी केली असता त्यात आरोपीनी कपाटाची उचकपाचक करून त्यातील ०१ लाख ९० हजार किमतीचे दागिने लंपास केले होते.या प्रकरणी मयताचा मुलगा फिर्यादी जालिंदर दत्तात्रय भुजाडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.नोंद क्रं.१९७/२०२२ भा.द.वि.कलम ३०२,३९७,३९४ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी पोलीस अधिकांऱ्यानी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे सह तीन पोलीस पथके नेमून तपास सुरु केला होता.त्यात प्रथम संशयित आरोपी अजय काळे यास जेरबंद केले होते.त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने यातील आरोपीची नावे विचारले असता त्याने पढेगाव ता.कोपरगाव येथील अजय छंदू काळे,तर दुसरा हिंगणी येथील,अमित कागद चव्हाण,तर जंतेश छंदु काळे अशा तिघांनी हा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.त्या प्रमाणे पोलिसांनी तपास केला असता ते निष्पन्न झाले होते.
दरम्यान यातील अजय काळे,अमित चव्हाण आदी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.क्रं.१/२०२१ भा.द.वि.कलम ३२३,३२४,५०४,५०६ गुन्हे दाखल आहे.त्यांना पोलिसांनी जेरबंद करून श्रीरामपूर येथील प्रथमवर्ग वरिष्ठ स्तर न्यायधीशांसमोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तीनही आरोपींस आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या गुन्ह्यात आरोपीनी वापरलेली मात्र विहिरीत कडेलोट केलेली दुचाकी,चोरून नेलेला सोने,नाणे,रोख रक्कम असा ऐवज जप्त केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या गंभीर गुंह्यातील आरोपींना अवघ्या तीन दिवसात जेरबंद केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close