जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगावातील ‘त्या’ आरोपीस चौदा दिवसांची न्यायिक कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु.ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर साईबाबा मंदिराच्या पूर्वेस साधारण दोनशे मीटर अंतरावर दि.०६ मे रोजी आज सकाळी ०७.४५ वाजेच्या सुमारास कोपरगाव कडे विद्यार्थ्यांना घेऊन कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या अपे रिक्षा दुचाकीस धडक देऊन त्यात सात जण ठार झाले होते ते पाच जण जखमी झाले होते या घटनेत कोपरगाव शहर पोलिसांनी पंजाब मधील आरोपी चालक दर्शनसिंग गजनसिंग (वय-४१) रा.पट्टीदाना मंडी, मानुके,ता.जागरिन,जिल्हा लुधियाना याचे विरुद्ध फिर्यादी दिगंबर गोविंद चौधरी (वय-४२) रा.पोहेगाव गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.

या प्रकरणी आज कंटेनर आरोपी चालक दर्शनसिंग गजनसिंग यास पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांनी कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.कोपरगाव वरिष्ठ अतिरिक्त न्यायदंडाधिकारी ए.सी.डोईफोडे यांच्या समोर हजर केले होते न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून त्या आरोपीस चौदा दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव कडून मुंबईकडे जाणाऱ्या पंजाब राज्यातील लोखंडी सळ्या घेऊन जाणारा कंटेनर क्रं.(पी.बी.०५ ए. बी.४००६) याने कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव-संगमनेर रस्त्याने मुंबईकडे जात असताना होता.समोरून येणाऱ्या रिक्षा व एक दुचाकीस जोराची धडक दिली होती.या अपघातात आपे रिक्षातील सहा जण जागीच ठार झाले होते.तर एकाने संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार करताना दम तोडला होता.

या घटनेत राजाबाई साहेबराव खरात रा.चांदेकसारे,आत्माराम जम्मानसा नाकोडे,पूजा नानासाहेब गायकवाड,हिंगणवेढे,प्रगती मधुकर होन रा.चांदेकसारे,शैला शिवाजी खरात,शिवाजी मारुती खरात हे पतिपत्नी दोन्ही रा.श्रीरामपुर आदी सहा जण घटनास्थळीच ठार झाले आहे तर सिन्नर येथील रुपाली सागर राठोड या महिलेवर उपचार सुरू असताना निधन झाले होते.या दुर्घटनेत असा एकूण सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता.तर अन्य
राठोड ध्रुव सागर,चौधरी कृष्णाबाई गोविंद,चौधरी सर्वेश दिगंबर,रा.पोहेगाव,खरात कावेरी विलास रा.झगडे फाटा,ता कोपरगाव.विलास साहेबराव खरात रा.झगडे फाटा पाच जण जखमी झाली होते.

या दुर्घटनेनंतर आरोपी चालक दर्शनशिंग हा पळून जाताना झगडेफाटा येथे नागरिक व पोलिसांनी जेरबंद केला होता.त्यानंतर त्यास अटक केली होती. त्यानंतर त्याच्या विरुद्ध काल उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.११६/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ) (ब) १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी आज आरोपीस पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांनी कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.कोपरगाव वरिष्ठ अतिरिक्त न्यायदंडाधिकारी ए.सी.डोईफोडे यांच्या समोर हजर केले होते न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून त्या आरोपीस चौदा दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close