जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगावातुन मुलीस पळविले,आरोपीस दोन दिवस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील संजयनगर येथील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला दि.१९ सप्टेंबरच्या पहाटे पळवून नेल्या प्रकरणातील आरोपी आकाश सचिन साटोटे यास कोपरगाव शहर पोलिसांनी नुकतीच अटक करून त्यास कोपरगाव येथील कोपरगाव न्यायालयातील तिसरे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांनी त्यास दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेऊन त्यास २२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे मुली पळविणाऱ्या प्रवृत्तीस चाप बसण्यास मदत होणार आहे.

शहर पोलिसांनी याबाबत शहरातील आरोपी आकाश साटोटे यास आज कोपरगाव येथील तिसरे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात घेऊन आरोपीस शहर पोलिसांनी तीन दिवस पोलीस कोठडी मागितली होती.न्यायालयाने दि.२२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,गेल्या साडेचार वर्षांत कोपरगाव शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे.यामध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ते ३३ इतके झाले आहे.हि गंभीर बाब आहे.या प्रकारचे गुन्हे पालकांसोबत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत.जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

शहर व तालुक्यात आठवड्यात एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.

कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र, यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.
अशीच घटना कोपरगाव शहरात संजयनगर परिसरात दि.१९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.आपली मुलगी रात्री घरात झोपलेली असताना पहाटे वडिलांनी उठून पहिले असता ती बेपत्ता झालेली आढळून आली होती.घरात तिच्या खेरीज आई,वडील,भाऊ,असे सर्वजण एकत्र रहातात.दि.१८ सप्टेंबर रोजी घरातील सर्व जण जेवण करून झोपी गेले असता सकाळी उठून त्यांनी आपली मुलगी सहज कुठे आहे म्हणून मागील खोलीत डोकावून पहिले असता ती दिसली नाही.म्हणून त्यांनी तिंचा शोध जवळचे नातेवाईक,परिचित इसम यांचेकडे पहिले असता ती मिळून आली नाही.त्यांना संशय आल्याने त्यांनी शाळेचे कागदपत्र शोधून पहिले असता तेही मिळून आले नाही.त्यामुळे त्यांचा संशय बळावला.व त्यांना मागील घटना आठवली.

एक महिन्यांपूर्वी त्यांना आपल्या मुलीचे त्याच गल्लीतील एका मुलाशी प्रेम प्रकरण असल्याचे समजले होते.त्यांनी त्यास घरी जाऊन त्यास समजावुन सांगितले व त्याच्या आई वडिलांना समज दिली होती.त्यांनी संशयित मुलाचा शोध घेतला असता ‘तो’ मिळून आला नाही.त्यावरून त्यांचा संशय बळावला होता.व त्यां बाबत मुलीच्या आईने (वय-३७) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत गु.क्रं.२९० /२०२० भा.द.वि.कलम ३६३ व वाढीव कलम ३६६ लावून गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीचा शोध घेतला असता त्यांचा अंदाज खरा निघाला होता.व आरोपी हा त्याच गल्लीतील रहिवासी होता.पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता त्याचे नातेवाईक सुतासारखे सरळ झाले व त्यांनी आरोपीस मुलीसह धुळ्याहून हजर केला.

शहर पोलिसांनी याबाबत आरोपीस आज कोपरगाव येथील तिसरे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात घेऊन आरोपीस शहर पोलिसांनी तीन दिवस पोलीस कोठडी मागितली होती.न्यायालयाने दि.२२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सरकारी पक्षाचे वतीने अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी काम पहिले तर आरोपीच्या वतीने अड्.वाय.एस.खालकर यांनी काम पाहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close