जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ‘त्या’रस्त्यांच्या संमेटाची बैठक संपन्न !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील विकासकामे व्हावीत यासाठी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप बंद करून उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी असे जाहीर आवाहन आपण केले होते.त्याला कोल्हे गटानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून आज.त्याच विषयावर नगरपरिषद कार्यालयातील पालिका दालनात कोल्हे गटाचे नेते पराग संधान व आजी माजी पदाधिकारी यांचेशी वातावरणात साधक बाधक चर्चा होऊन शंकांचे निरसन करून स्थगिती घेणाऱ्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून स्थगिती उठवून घ्यावी असे ठरले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

दरम्यान माजी आ.कोल्हे गटाने उच्च न्यायालयाचे माध्यमातून काळहरण करून सत्तासंक्रमणाची नेमकी वेळ साधल्याचे बोलले जात आहे.कारण आता निवडणूक अवघी साठ दिवसावर येऊन ठेपली आहे.व त्यांचा हेतू साध्य झाला आहे.कारण या कालखंडात कोणीही ठेकेदार (वर्तमान व आगामी येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डबल टक्का द्यावा लागत असल्याने) काम करण्यास तयार होत नाही.परिणामस्वरूप यातून केवळ कोल्हे गटाचे प्रतिमा मंडन होणार आहे.रस्त्याची कामे नव्हे.त्यामुळे या चर्चेतून नागरिकांची धुळमुक्तीतून सुटका होणार नाही की अपघातातून.हा केवळ बोलाचा भात व बोलाची कढी ठरणार असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांच्या कामास माजी आ.कोल्हे गटाने श्रेयवादाने पछाडून संबंधित कामांना खोडा घालण्यासाठी (अद्याप काम सुरूच झाले नसतानाही) भ्रष्टाचाराच्या नावाखाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून आगामी नगरपरिषद निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन स्थगिती आणली होती.त्यातच ‘आधी हौस आणि त्यात पडला पाऊस’ या म्हणीनुसार शहरातील रस्त्यांची पार रया गेली होती.त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी व त्यांचे नेते यांना शहरातील व बाहेरून येणारे नागरिक शिव्यांची लाखोली वहात होते.

माजी आ.कोल्हे गटाची व सत्ताधारी गटाची मोठी गोची झाली होती.त्यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी एका नगरसेवकाने नगराध्यक्ष वहाडणे यांची नुकतीच भेट घेतली होती.व त्यातून मार्ग काढण्याची विनंती केलेली होती.त्यानुसार नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन व स्वतः पुढाकार घेऊन,” जितके काम,तितके बिल” असा मार्ग काढून वाचा फोडली होती.त्याला कोल्हे गटाचे नगरसेवकांनी मोठा उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.व कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन ती बाब जाहीर केली होती.त्यावर शहरात उलतसुलतच चर्चेला उधाण आले होते.

त्या नंतर काळे विरुद्ध कोल्हे अशी आरोप-प्रत्यारोप यांची नेहमीच्या सवयी प्रमाणे राळ उठली होती.त्यावर आणखी एक पाऊल म्हणून आज पराग संधान यांनी भेट घेतली असल्याचे नगराध्यक्ष वाहडणे यांनी जाहीर केले आहे.

सदर बैठकीत नगरपरिषदेतील सर्व गटनेते,नगरपरिषद बांधकाम अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या समितीने संबंधित कामे दर्जेदार करून घ्यावीत व काटेकोरपणे मोजमाप घेऊन देयके अदा करावीत असे ठरले.राजकिय आरोप प्रत्यारोप बंद करून शहराची उर्वरीत विकासकामे मार्गी लागावीत हीच जनतेची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.त्यानुसारच स्थगिती उठविल्यानंतर लवकरच विकास कामे मार्गी लागतील अशी आपल्याला आशा असल्याचेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close