जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात ट्रक चालकांवर हल्ला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

बडनगर मध्यप्रदेश येथील आयशर कंपनीचा (क्रं.एम.पी.०९,जी.जी.२२२६) फिर्यादी ट्रक चालक उकार उर्फ अर्जुन शंकरलाल मेवाडा (वय-२५) हे कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल राजस्थान समोर उभ्या केलेल्या आपल्या गाडीत झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना जाग आल्याने त्यांनी त्याचा हात धरून विरोध करुन आरडाओरडा केला असता त्यानां व त्यांच्या मदतीला धावून आलेल्या सहकाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

संग्रहित छायाचित्र

आयशर ट्रक चालक हा कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजस्थान ढाबा येथे उभा केला होता.व ते आपल्या सहकाऱ्यांसोबत झोपी गेले होते.आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या खिशात असलेला भ्रमणध्वनी कोणीतरी अज्ञात इसम काढून घेत असल्याचे जाणवले व त्यानां जाग आली.व त्यांनी त्या चोरट्याचा रंगेहात चोरी करताना हात पकडून विरोध केला असता.तीन पैकी एका चोरट्याने त्यांना पैशासाठी धमकी देऊन चाकूने हल्ला करून जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मध्यप्रदेश बडनगर येथील फिर्यादी चालक अर्जुन मेवाडा यांचा वाहतुकीचा व्यवसाय असून ते नगर-मनमाड या मार्गाने नेहमी जा-ये करत असतात.दि.१९ सप्टेंबर रोजी ते याच मार्गाने नगर कडे जात असताना रात्री उशीर झाल्याने त्यांनी आपला वरील क्रमांकाचा आयशर ट्रक कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजस्थान ढाबा येथे उभा केला होता.व ते आपल्या सहकाऱ्यांसोबत झोपी गेले होते.

आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या खिशात असलेला भ्रमणध्वनी कोणीतरी अज्ञात इसम काढून घेत असल्याचे जाणवले व त्यानां जाग आली.व त्यांनी त्या चोरट्याचा रंगेहात चोरी करताना हात पकडून विरोध केला असता.त्या चोरट्याने त्यांना,”शोर मत मचाओ,और पैसे निकालो,नही निकालोगे तो मारुंगा” असा धमकीवजा इशारा दिला.व त्यांनी आरडाओरडा केला असता त्याने त्याच्या हातातील चाकूने त्यांच्या उजव्या मांडीवर,कमरेवर,हातावर चाकूने वार करून जखमी केले आहे.या शिवाय त्यांचा आरडा ओरडा ऐकून त्यांचा एक सहकारी गोकुळसिंग प्रेमसिंग रजपूत मदतीला आला असता त्याच्याही पोटावर त्यांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे.व आपल्या पल्सर गाडीवरून तीन चोरट्यानी पोबारा केला आहे.पळून जाताना त्यांनी सोबत १० हजार रुपये किमतीचा सोनेरी रंगाचा सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी पळवुन नेला आहे.

या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास भेट दिली आहे.जखमी हे कोपरगाव येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३४१ भा.द.वि.कलम ३९४,३९७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close