जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू…!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी ईश्वरे मच्छिंद्र सारंगधर (प्रभाग क्रं.१४ अ.) माळी अक्षय  बाळासाहेब (प्रभाग क्रं.५ अ.) बाबुराव सावळेराम पवार,(प्रभाग क्रं.२अ) व मंदा मढवई (प्रभाग क्रं. 5 ब.) आदीं चार उमेदवारांनी आज माघार घेतली आहे.मात्र त्यात कोणाही प्रमुख उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नसल्याने कोपरगाव नगरपरिषद निवडणूक बहुरंगी आणि बहुढंगी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.त्यातच शिंदे सेनेने एक मोठी संधी घालवली असून त्यांना तिसरा ध्रुव निर्माण करण्याची संधी असूनही त्यांच्या हाती धुपाटणे येण्याची शक्यता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

वर्तमान जगात आणि विशेषतः कलियुगात आज खऱ्या माणसाचे राजकारण…हा प्रांत उरलेला नाही हेच खरे असल्याचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे पाहून वारंवार जाणवत रहाते आहे.परिणामी आज त्यांचे सहकारी आज त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्याचे वास्तव आज जगासमोर आले आहे.परिणामी त्यांची अवस्था ही महाभारतातील अभिमन्यू सारखी झाली असल्याचे दिसून येत आहे.

   राज्यात एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.तर उमेदवारी मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे.तर 3 डिसेंबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर होतील.त्यामुळे राज्यातील मतदारांचे या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत वेगळी स्थिती नाही.या ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याची चिन्हे आहे.भाजप निष्ठावान गटाचे अपक्ष उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,वर्तमानात कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सपना मोरे,शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी तर उघड उघड एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेच पण अपक्ष उमेदवार दिपक वाजे हेही कोल्हे गटापुढे ठामपणे उभे असल्याने कडवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.यातील कोणी मागे घेईल अशी सुतराम शक्यता दिसत नाही.परिणामी ही लढत  बहुरंगी होणार असल्याचे उघड आले आहे.

  

एकनाथ शिंदे गटाने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना आगामी विधानसभेसाठी शब्द दिला तर त्यांच्या काही हाती काहीतरी येवू शकत असल्याचे वाटत राहते आणि शिंदे सेनेचे मेरिट मोठया प्रमाणात वाढू शकते.मात्र ते साध्य करण्यासाठी शिंदे सेनेत मोठ्या मनाचे नेते आणि पदाधिकारी दुर्दैवाने दिसत नाही.’गल्लाभरू नेते’ ही जिल्हा शिंदे सेनेची वर्तमानात मोठी समस्या आणि अडचण आहे.

   

भाजपचे उमेदवार पराग संधान-राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे.

  

  

राजीनामा दिलेले मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल.

   दरम्यान यात माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माघार घ्यावी यासाठी शिंदे सेनेचे उमेदवाराचे वतीने एका सरंजामी जिल्हा पदाधिकाऱ्याने त्यांना आपल्या कोपरगावस्थित बुरुजावर येण्याचा आदेश देऊन पाहिला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मात्र त्यांनी तो आदेश जुमानला नसल्याने त्यांची मोठी फटफजिती झाली असल्याचे समजत आहे.दरम्यान निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते असलेल्या वहाडणे यांची आधी त्यांच्याच भाजपने कुचेष्टा केल्याने त्यांनी विमनस्क अवस्थेत एकनाथ शिंदे गटाचे संगमनेर येथील लोकप्रतिनिधी यांची भेट  घेऊन पाहिली होती.मात्र त्यांनी दबावात त्यांना नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.त्यातून शिंदे सेनेने एक चांगला मोहरा गमावला आहे.कारण त्यातून तिसरा ध्रुव निर्माण होण्याची त्यांनी एक चांगली संधी गमावली असल्याचे वर्तमानात तरी दिसत आहे.मात्र आता शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे यांचे वारूसमोर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे गतिरोधक स्पष्ट दिसू लागल्यावर त्यांना जाग आली आहे.मात्र त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याचे दिसत आहे.दरम्यान आता वहाडणे हे मागे येण्याची शक्यता मावळली असल्याचे मानले जात आहे.त्यातच त्यांनी शहरात आपले मोठमोठे बॅनर लावून पुढील योग्य तो संदेश दिला आहे.मात्र वहाडणे यांनी बरीच चांगली कामे करूनही त्यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांनी ग्लोबेल्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना बदनाम करण्याचे व त्यांचे मागील सैन्य काढून घेण्याचे पातक केले आहे.परिणामी त्यांची अवस्था पंख छाटलेल्या जटायू सारखी झाली आहे.विजय वहाडणे यांनी आपल्या कार्यकाळात मोठी विकास कामे केली हे निर्विवाद आहे.त्यांनी शहराची पाणी चोरी बंद केलीच शिवाय त्यांच्या सहकार्याने शहराचा पाच क्रमांकाचा तलाव झाला हे कोणीही नाकारू शकत नाही.पायाभूत सेवामधील समजले जाणारे रस्ते विविध गार्डन झाल्या असून भ्रष्टाचार किमान (झाला नाही असा दावा नाही) पातळीवर आणला आहे.मात्र यांचा कालावधी संपून जवळपास चार वर्षाचा कालखंड लोटला आहे.परिणामी वर्तमानात नेत्यांनी केलेले एक महिन्यात रस्ते होत्याचे नव्हते होतात परिणामी वहाडणे यांच्या कार्यकाळात झालेल्या त्या चार वर्षाची गोष्ट निराळी होत आहे.त्यांच्या काळात पाण्यासाठी एकही मोर्चा आला नाही हे निर्विवाद सत्य आहे.नगरपरिषद कार्यालयात व अध्यक्षाभोवती ठेकेदारांचे कोंडाळे आढळून आले नाही.तरीही त्यांनी त्यांच्या पदाचा वापर संघटना वाढीसाठी केला नाही हेही सत्य नाकारता येत नाही.परिणामी मोठी संधी मिळूनही त्यांच्या सोबत शहरात आणि तालुक्यात संघटना बळकट झाली नाही.त्यांना एक चूक अवश्य नडली आहे.परिणामी त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची ऐतराजी झाली असल्यास नवल नाही.दुसरी चूक म्हणजे त्यांनी मागील निवडणुकीत आपल्या खाली असलेल्या नगरसेवक पदाच्या जागा लढवल्या नाही.परिणामी त्यांना ठराव मंजूर करताना काळे आणि कोल्हे गटाच्या कुबड्या वारंवार घ्याव्या लागल्या होत्या.परिणामी त्यांच्या स्वभावाला त्यांना मोठी मुरड घालावी लागली होती.परिणामी त्यांची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झाली असल्यास नवल नाही.तरीही त्यांनी आपल्या कामातून भेदभाव केल्याचे आढळून आले नाही.त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात एकही ध्वजारोहण स्वतः केले नाही.त्यांनी सामान्य नागरिक स्वच्छता,आरोग्य कर्मचारी,नगरपरिषद वाहन चालक आदींना हा सन्मान मिळवून दिला होता.जो आजवर एकाही नेत्याला दाखवता आला नव्हता.नगरपरिषद कामकाज संपल्यावर हा नगराध्यक्ष स्वतःच्या पायाचे घरी चालत जाताना अनेकांनी पाहिला होता.जे नगर परिषदेच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात एक मोठे आक्रित होते.तरीही वर्तमान जगात आणि विशेषतः कलियुगात आज खऱ्या माणसाचे राजकारण…हा प्रांत उरलेला नाही हेच खरे असल्याचे वारंवार जाणवत रहाते आहे.परिणामी आज त्यांचे सहकारी आज त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्याचे वास्तव आज जगासमोर आले आहे.खरे तर यावेळी त्यांनी थांबणे आवश्यक असून जगाचे चटके त्यांच्या खेरीज कसे असतात त्याचे भान त्यांच्या कार्यकर्त्यांना आणून देणे गरजेचे आहे.त्यांची तोंडे फुटल्यावर ही मंडळी पुन्हा त्यांचेकडे येणार आहे.मात्र तो पर्यंत वेळ निघून गेलेली असेल हे नक्की.मात्र त्यांची गाडी बरीच पुढे निघून गेल्याने आणि त्यांच्याच सहकाऱ्यांनी दगाबाजी केले म्हणण्यापेक्षा त्यांना वर्तमान पुढाऱ्यांनी मधाचे बोट चाटवल्याने आज त्यांना चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू प्रमाणे एकाकी झुंज लढावी लागत आहे.परिणामी त्यांची लढत थांबणे आता तरी शक्य दिसत नाही.

माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे       माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे.

दरम्यान एका माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने कोपरगाव तिसऱ्या शक्तीचे अवकाश भरून काढण्यासाठी मोठा प्रयत्न केला होता अशी विश्वसनीय माहिती असून त्यासाठी पूर्ण पॅनल देण्याचे आदेश दिले होते.मात्र एका जिल्हास्तरीय नेत्याने येथे पॅनल उभा होऊ शकत नसल्याची बतावणी करून अप्रत्यक्ष ईशान्य गडाची पाठराखण केली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.परिणामी कोपरगावकरांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजले जात आहे.

    दरम्यान त्यासाठी शिंदे गटाने त्यांना आगामी विधानसभेसाठी शब्द दिला तर काही हाती येवू शकत असल्याचे वाटत राहते आणि शिंदे सेनेचे मेरिट मोठया प्रमाणात वाढू शकते.मात्र ते साध्य करण्यासाठी शिंदे सेनेत मोठ्या मनाचे नेते आणि पदाधिकारी दुर्दैवाने दिसत नाही.’गल्लाभरू नेते’ ही जिल्हा शिंदे सेनेचे मोठी समस्या आणि अडचण आहे.परिणामी शिंदे सेनेला उज्ज्वल भविष्य असतानाही त्यांची अवस्था विहिरीतील बेडकासारखी आहे.त्यामुळे अखेरच्या दिवशी ते काय दिवे लावतात याकडे शहरातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close