जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

जिल्हा परिषद शाळेचे,’नवीन आदर्श मॉडेल ‘

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  राज्यातील जिल्हा परिषद शाळा हा वर्तमानात मोठा चिंतेचा आणि गंभीर विषय ठरत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शाळेने जिल्हा परिषद शाळेचे पारंपरिक मापदंड मोडून काढले असून आदर्श,निसर्गसंपन्न आणि अद्यावत डिजिटल शाळांचे उदाहरण राज्यात निर्माण करून जिल्हा परिषद शाळा कशी असावी याचे मापदंड स्थापित केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीस नुकतेच एका पाहणीत आढळून आले आहे.त्यामुळे या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संवत्सर जिल्हा परिषद शाळा इमारत आणि तिचे स्वच्छ प्रांगण.

“संवत्सर येथील शाळेत असलेली परसबाग,बालवाटिका,सौरउर्जा प्रकल्प,संपूर्ण इमारतीचे रेन वॉटर हार्वेस्टींग,विद्यान प्रयोगशाळा,बालस्नेही बहुउद्देशीय सभागृह,हँडवॉश स्टेशन,संगणक प्रयोगशाळा,प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड,टॅब सुविधा,मुलांसाठी सुसज्ज ग्रंथालय,सर्व सुविधांनी युक्त असा डायनींग हॉल,व्यासपीठ,खेळांसाठी विस्तीर्ण मैदान,ओपन जीम,स्वच्छतागृहे अशा सर्व सुविधा कार्यान्वित आहेत.ती नुसती औपचारिकता पूर्ण करणारी नाही तर प्रशस्त आहे”- राजेश परजणे,शाळेचे मार्गदर्शक आणि माजी सदस्य,जिल्हा परिषद अहिल्यानगर.

   एरव्ही जिल्हा परिषद शाळा म्हटले की पालक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांच्या कपाळावर आठ्या न पडल्या तर नवल ! अनेक शाळांच्या इमारती जुन्या आणि मोडकळीस आलेल्या असल्याचे दिसून येत आहे.छताला गळती असणे,भिंतींना तडे जाणे अशा समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.अनेक शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालये नाहीत.पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसणे आणि वीज पुरवठा खंडित असणे या मोठ्या अडचणी आहेत.त्यांना शिक्षकांची कमतरता भासत असून एक शिक्षकी शाळा तर बरेच वेळा वीणा शिक्षकी म्हणून गणल्या जात असून वर्तमानपत्रांच्या बातम्यांच्या विषय ठरत असताना आढळून येत आहेत.अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत.काही ठिकाणी एकच शिक्षक संपूर्ण शाळा (पहिली ते चौथी) सांभाळतो,ज्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतअसताना आढळून येत आहे.

संवत्सर जिल्हा परिषद शाळेने एका कलाकाराकडून तयार केलेले कृत्रिम जंगल.

संवत्सर येथील शाळेत असलेली झाडांची नावे त्याचे शास्त्रीय नाव आणि त्याचा आपल्या राशीशी असलेला संबंध दाखवून देत आपल्या ज्ञानात भर घालताना दिसून येत होता.त्यात कदंब,बेहडा,रक्तचंदन,बेल,जांभूळ,रुई,शिसम,बांबू,लवंग,गुलमोहर,पारिजातक,चाफा,अशोक,खैर,शमी,नागकेशर,अर्जुन,पळस,कांचन आदी वनराई दाखवून त्यांचा आपल्या राशीशी असलेला संबंध दाखवून दिला आहे.त्यातून विद्यार्थींची ज्ञानाची भूक भागण्यास मोठी संधी निर्माण झाली आहे.

   दरम्यान या शाळांना सरकारकडून अपुरा निधी मिळत असून शाळांच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी मिळणारा शासकीय निधी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळत नाही.खाजगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांमध्ये संगणक,इंटरनेट आणि डिजिटल बोर्ड्स यांसारख्या आधुनिक शैक्षणिक साधनांची तीव्र कमतरता आहे.याचा परिणाम म्हणून या शाळातून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत असून सुविधांअभावी पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमधून काढून खाजगी शाळांमध्ये टाकत आहेत,ज्यामुळे झेडपी शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत आहे.अपुऱ्या सोयी-सुविधा आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया कमकुवत राहत आहे.परिणामी त्याचा आर्थिक भुर्दंड गरीब आणि आर्थिक दुर्बल घटक असलेल्या गरीब पालकांना बसत असून त्यांची इच्छा नसतानाही कर्ज काढून मुलांना महागड्या खाजगी शाळांमध्ये पाठवावे लागत आहे.हे वर्तमान जिल्हा परिषद शाळांचे उदाहरण आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील एक शाळा या सार्वत्रिक चित्राला अपवाद ठरली आहे.त्यांनी हे सर्व वर्तमान मापदंड मोडून काढले असून जिल्हा परिषद शाळा कशी असावी याचे उदाहरण निर्माण केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीस नुकतेच आढळून आले आहे.

संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेने तयार केलेले जंगल आणि त्यातील प्राणी हरिण दिसत आहे.

 

“सन-१९०८ पासूनचे डिजिटल दाखले शाळेत जतन करुन ठेवलेले असून ते एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आलेली आहे.शाळेतील पाला पाचोळ्यापासून गोबर गॅस निर्मिती,गांडूळ खत,सेंद्रिय खत निर्मिती करुन ते परसबागेसाठी वापरले जात आहे.पहिलीतील विद्यार्थी तीन अंकापासून पुढील बेरीज वजाबाकी संख्येवरील क्रिया करतात.तर दुसरीमधील विद्यार्थी चार अंकी संख्यावरील क्रिया करतात.हे इतरत्र कुठेही आढळून येत नाही.गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाचवी वर्गातील २१ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविलेले आहे”- फय्याजखान पठाण,मुख्याध्यापक,जिल्हा परिषद संवत्सर शाळा.

    दरम्यान यासाठी निमित्त होते.गोदावरी तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक स्व.नामदेवराव परजणे यांच्या 22 व्या स्मृती दिनाचे.संवत्सर येथील नामदेवराव परजणे महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या पूर्वी नाही म्हणायला दूध संघाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी ज्या ज्या वेळी भेट होईल त्या त्या वेळी बोलण्याच्या ओघात या शाळेबद्दल त्रोटक माहिती दिली होती.त्यामुळे ही शाळा पाहण्याची उत्कंठा होतीच.पण तो योग आला तो गत महिन्याच्या 20 जून रोजी.कार्यक्रम संपल्यावर साहजिकच माझी पावले या शाळेसमोरून जाताना नकळत ओढली गेली.आणि  मी त्या ठिकाणी गेलो असता.रस्त्याच्या पूर्वेस प्रवेशद्वार लक्ष वेधून घेत होते.शिवाय शाळेच्या रस्त्यालगतच्या भिंती ओरडून सांगत होत्या की हीच ती शाळा जेथे नाविन्याचे पूजन होत आहे.शिवाय त्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस दिसणारी आणि एखाद्या महाविद्यालयाला लाजवील अशी भव्य इमारत लक्ष वेधून घेत होती.त्यामुळे माझी उत्कंठा अजून चाळवली गेली होती.मध्ये काही म्हणण्यापेक्षा शंभरएक फूट पूर्वेला गेलो असेल नसेल तोच त्या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक पठाण सर काही मान्यवरांना शाळेच्या जंगली झाडांची आणि त्याचा आपल्या राशीशी असलेला संबंध याची माहिती देतच बाहेर पडत होते.त्यात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,प्रशांत तोरवणे आणि बदलून गेलेले ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील माळी आदी मान्यवर त्यात होते.बहुदा त्यांनी सर्व शाळेला नजरेखालून घालून ते परतीच्या मार्गात होते.आणि त्याच वेळी आमचा प्रवेश त्या ठिकाणी झाला होता.

   त्यांनी लागलीच मला त्यांनी प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला जे वन विकसित केले होते.त्याकडे घेऊन गेले.आणि त्यात नाना तऱ्हेची लावलेली झाडे,वृक्षराजी आणि त्यांची त्याचे जवळ असलेली माही दाखवत उत्कंठा वाढवली.आणि त्यात असलेली झाडांची नावे त्याचे शास्त्रीय नाव आणि त्याचा आपल्या राशीशी असलेला संबंध दाखवून देत आपल्या ज्ञानात भर घालताना दिसून येत होता.त्यात कदंब,बेहडा,रक्तचंदन,बेल,जांभूळ,रुई,शिसम,बांबू,लवंग,गुलमोहर,पारिजातक,चाफा,अशोक,खैर,शमी,नागकेशर,अर्जुन,पळस,कांचन आदी वनराई दाखवून त्यांचा आपल्या राशीशी असलेला संबंध दाखवून दिला आहे.त्या वनराईत वाघ,सिंह,हरिण आदी जंगली प्राणी न दिसले तर नवल होते.हे जंगल आताच कुठे लावलेले असले तरी त्याची चुणूक नक्कीच मनाला वेधून घेत नसली तर नवल होते.तर उजव्या हाताला शाळेच्या आवारात असलेली भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आझाद ओपन सायन्स पार्क जोरजोराने हाक मारताना दिसून येत होती.त्या ठिकाणी विज्ञानाचे महत्व अधोरेखित करणारे विविध प्रयोग दिसत होते.त्यांनी बालमनाला खेचून न घेतले तर नवल होते.

संवत्सर जिल्हापरिषद शाळेने लावलेली जंगली झाडे आणि त्यांचा राशीशी असलेला संबंध दाखवणारा फलक दिसत आहे.

संवत्सर जिल्हा परिषद शाळा ही नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधने,प्रकल्पाधारित शिक्षण यासारख्या आधुनिक पध्दतीचा वापर करणाऱ्या शाळांमध्ये संवत्सर जिल्हा परिषद शाळा अग्रस्थानी असून काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता,समीक्षणात्मक विचारसरणी आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यावर शाळेने अधिक भर दिल्याचे निदर्शनास येते.

    दरम्यान त्याच वेळी मला काही पक्षाचा किलबिलाट ऐकू येत होता.त्यामुळे काही वेळ मी संभ्रमित होतो.नेमका हा आवाज कुठून येत आहे यासाठी कान टवकारले होते.पण पुढे गेल्यावर त्याचा उलगडा झाला.कृत्रिम जंगल निर्माण केले असून त्यात विविध पक्षांचे आवाज रेकॉर्ड करून त्याची धून सुरू होती.आणि खरोखरच आपण जंगलाचा अनुभव घेत असल्याचे जाणवत होते.त्याचं वेळी त्या ठिकाणी पुणे येथील शिक्षण संचालक अनिल गुंजाळ आणि त्यांचे सहकारी आले होते त्यांनीही या शाळेचे सैर करून शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांची पाठ थोपटली असल्याचे दिसून आले आहे.त्याचं वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनीही या ठिकाणी पाहणी करून कौतुक केल्याचे आढळून आले आहे.आज स्व.नामदेवराव परजणे यांचा स्मृती दिन असल्याचे ज्यांना जमेल ती सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून भेटताना दिसून येत होती.त्यानंतर पठाण सर यांनी मला मागील मैदान त्या ठिकाणी असलेल्या क्रीडा सुविधा दाखवून दिल्या आहे.शिवाय दोन्ही मजल्यांची सैर घडवून शाळा कशी असावी याचे दर्शन घडवले आहे.

   दरम्यान या ठिकाणी असलेले परसबाग,बालवाटिका,सौरउर्जा प्रकल्प,संपूर्ण इमारतीचे रेन वॉटर हार्वेस्टींग,विद्यान प्रयोगशाळा,बालस्नेही बहुउद्देशीय सभागृह,हँडवॉश स्टेशन,संगणक प्रयोगशाळा,प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड,टॅब सुविधा,मुलांसाठी सुसज्ज ग्रंथालय,सर्व सुविधांनी युक्त असा डायनींग हॉल,व्यासपीठ,खेळांसाठी विस्तीर्ण मैदान,ओपन जीम,स्वच्छतागृहे अशा सर्व सुविधा कार्यान्वित आहेत.ती नुसती औपचारिकता पूर्ण करणारी नाही तर प्रशस्त आहेत.एखाद्या मंगल कार्यालयाला लाजवील अशी प्रशस्त.या शिवाय शाळेच्या आवारात वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन,बॉटनिकल गार्डन अशा उपक्रमाबरोबरच परसबागेत भाजीपाला,फळ झाडांची लागवड करुन उत्पन्न घेतले जाते.शाळेत अद्ययावत असे मुख्याध्यापकांचे कार्यालय आहे.ते तर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयाला लाजवेल असे म्हटले तर वावगे ठरू नये असे आहे.त्यात साऊंड सिस्टीम,सी.सी.टी.व्ही.फुटेज पाहण्याची व्यवस्था केलेली आहे.याच कर्यालयातून मुख्याध्यापकांना सर्व वर्गांशी संपर्क करता येतो.शाळेने आपल्या सर्व दप्तराचे अद्यावतिकरण केले असून त्यात सन-१९०८ पासूनचे डिजिटल दाखले शाळेत जतन करुन ठेवलेले असून ते एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आलेली आहे.शाळेतील पाला पाचोळ्यापासून गोबर गॅस निर्मिती,गांडूळ खत,सेंद्रिय खत निर्मिती करुन ते परसबागेसाठी वापरले जात आहे.पहिलीतील विद्यार्थी तीन अंकापासून पुढील बेरीज वजाबाकी संख्येवरील क्रिया करतात.तर दुसरीमधील विद्यार्थी चार अंकी संख्यावरील क्रिया करतात.हे इतरत्र कुठेही आढळून येत नाही.गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाचवी वर्गातील २१ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविलेले आहे.त्यात एक विद्यार्थी राज्यपातळीवर आलेला आहे.तसेच पाच वर्षात सुमारे साठहून अधिक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे हे विशेष ! इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्यांचा लॅपटॉपच्या सहाय्याने अभ्यास सराव करुन घेतला जात आहे.त्यातून विद्यार्थ्यांची चांगली प्रगती दिसून येत असून ‘ मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा..’ या योजनेत शाळेने सलग दोन वर्षे विभाग स्तरावरील पारितोषिके प्राप्त केलेली आहेत.याशिवाय महाराष्ट्र राज्यात स्कॅफ उपक्रमात शाळेने प्रथम दहा शाळांमध्ये स्थान मिळविलेले आहे.

   ‘ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा..’ टप्पा क्रमांक तीनसाठी शाळेचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मूल्यांकन झालेले असल्याची माहिती मुख्याध्यापक पठाण सर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रुपये ५१ लाख तर द्वितीय क्रमांकासाठी रुपये ३१ लाखाचे पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.त्यात ही शाळा बाजी मारणार असे संकेत स्पष्ट मिळत आहेत.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्यादृष्टीने शिक्षक दर रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळेत येऊन मार्गदर्शन करीत असतात.शाळेत दरवर्षी पहिलीच्या वर्गाचे प्रवेश मार्च महिन्यातच पूर्ण होतात.विशेष म्हणजे दाखलपात्र पेक्षाही अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात.गेल्या पाच वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे.शासनाच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील ३६ शाळांची एज्युकेशन टूरसाठी निवड करण्यात आलेली असून त्यात संवत्सर जिल्हा परिषद शाळेचाही समावेश आहे.शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे शिंगापूर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांची निवड करण्यात आली होती.हा या शाळेचा सन्मान न ठरला तर नवल!

शाळेत दरवर्षी पहिलीच्या वर्गाचे प्रवेश मार्च महिन्यातच पूर्ण होतात.विशेष म्हणजे दाखलपात्र पेक्षाही अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात.गेल्या पाच वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे.शासनाच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील ३६ शाळांची एज्युकेशन टूरसाठी निवड करण्यात आलेली असून त्यात संवत्सर जिल्हा परिषद शाळेचाही समावेश आहे.शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे शिंगापूर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांची निवड करण्यात आली होती हे विशेष !

  दरम्यान या शाळेच्या विकासात राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांचे सतत मार्गदर्शन असते.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांचा शाळेच्या विकासासाठी व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु असल्याची माहिती मुख्याध्यापक पठाण यांनी मोठया गौरवाने दिली आहे.याशिवाय गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांचेही शाळेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान लाभलेले आहे.शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांची विवेकशीलता व कार्यतत्परता मुलांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच शाळेच्या मानांकनात अधिक भर टाकणारी ठरत आहे.मात्र अलीकडील काळात या ठिकाणी शाळेला भेटी देणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत असून या ठिकाणी एखाद्या मार्गदर्शकाची आवश्यकता असल्याचे वारंवार जाणवत होते.कारण पठाण सर याचा यात जास्त वेळ जाताना दिसून येत होता.आणि तो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भविष्यात परिणाम करू शकतो.मात्र शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समन्वयातून संवत्सरची ही शाळा आज राज्यातील इतर शाळांसाठी प्रेरक ठरेल हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधने,प्रकल्पाधारित शिक्षण यासारख्या आधुनिक पध्दतीचा वापर करणाऱ्या शाळांमध्ये संवत्सर जिल्हा परिषद शाळा अग्रस्थानी असून काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता,समीक्षणात्मक विचारसरणी आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यावर शाळेने अधिक भर दिल्याचे निदर्शनास येते.जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था हा खरोखरच अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा थेट जोडलेला मुद्दा आहे.शिक्षणावर सरकार कमी खर्च करत आहे.असे असताना एखाद्या शाळेने आणि त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक राजेश परजणे यांच्या सारख्या उमद्या नेतृत्वाने त्यात खास दखल घेऊन त्या शाळेला राज्य पातळीवर नेवून ठेवले तर आश्चर्य वाटावयास नको.त्यांना सरपंच,उपसरपंच विवेक परजणे आणि त्यांचे सहकाऱ्यांची व ग्रामस्थांची मोठी मदत होत आहे.त्यामुळे ही शाळा शिक्षक,पालक,विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमीनी नक्कीच पहावयास हवी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close