निवडणूक
…या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर

न्यूजसेवा
संवत्सर -(शिवाजी गायकवाड)
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार,जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींची 17 जागांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याची आणि त्यावर आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या आघाडीच्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून यात 06 प्रभागातील 17 जागांचे आरक्षण आज मान्यवरांच्या उपस्थितीत जागी करण्यात आले आहे.त्याबाबत,” कही खुशी,काही गम” अशा संमिश्र प्रतिक्रया उमटल्या आहेत.

सन-2021 च्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेश परजणे गटाने ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामाच्या डोंगरावर 17 पैकी 15 जागा पटकावल्या होत्या तर कोल्हे गटाला प्रभाग क्रमांक चार मध्ये केवळ 03 जागांवर समाधान मानावे लागले होते.आता यावेळी कोल्हे गटाने या ग्रामपंचायतीत आपले बलाबल वाढविण्यासाठी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्षपद देऊ केले असून त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याचे मोठे आव्हान उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांचे समोर उभे आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या ८७० ग्रामपंचायतींच्या तर कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींचा प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.स्थानिक पातळीवर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडत असून,यामध्ये महिलांसाठी ५०% आरक्षण,नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) आणि अनुसूचित जाती/जमाती (एस.सी./एस.टी.) यांच्या लोकसंख्येनुसार जागा आरक्षित केल्या जातात.संवत्सर येथील ग्रामपंचायत राजकीय व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असून त्याचे आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.आज त्याची सोडत तलाठी यांचे प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,बाजार समितीचे संचालक खंडू फेफाळे,माजी संचालक पांडुरंग शिंदे,बापू बारहाते,माजी उपसरपंच विवेक परजणे,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मण साबळे,लक्ष्मण परजणे,सोमनाथ निरगुडे,दिलीप ढेपले,भाऊसाहेब लोहकने,तुषार बारहाते,पंडित भारुड,महेश परजणे,बंधू आचारी,अविनाश गायकवाड,कृष्णा आबक,अशोक लोहकने,बाळासाहेब दहे,शिवाजी बारहाते,बाळासाहेब भोसले,मधू शेटे,त्र्यंबक परजणे,कारभारी भाकरे,मंडलाधिकारी कोल्हे मॅडम,कामगार तलाठी वाडेकर मॅडम,ग्रामविकास अधिकारी कृष्णा अहिरे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

दरम्यान जाहीर करण्यात आलेले आरक्षण दर्शवले आहे.त्यात प्रथम प्रभाग क्रमांक-एकूण जाहीर जागा,जागेचे आरक्षण आणि सदस्य संख्या दर्शवली आहे.प्रभाग क्रमांक -01-जागा -03 गावठाण,अनुसूचित जाती महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक -02,जागा-3,मनाई वस्ती व औद्योगिक वसाहत अनुसूचित जाती व्यक्ती,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण व्यक्ती,प्रभाग क्रमांक -03 ,जागा -3,नऊ चारी -अनुसूचित जमाती महिला,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण व्यक्ती,प्रभाग क्रमांक -04 जागा- 2 लक्ष्मणवाडी अनुसूचित जाती महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग,व्यक्ती,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण व्यक्ती,प्रभाग क्रमांक -05 जागा- 3 दशरथवाडी अनुसूचित जमाती व्यक्ती,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रमांक -06 जागा- 3 रामवाडी,बिरोबा चौक -सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण व्यक्ती,सर्वसाधारण व्यक्ती आदींचा समावेश आहे.

सन-2021 च्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेश परजणे गटाने ग्रामपंचायतीच्या विकास कामाच्या डोंगरावर 17 पैकी 15 जागा पटकावल्या होत्या तर कोल्हे गटाला प्रभाग क्रमांक चार मध्ये केवळ 03 जागांवर समाधान मानावे लागले होते.आता यावेळी कोल्हे गटाने या ग्रामपंचायतीत आपले बलाबल वाढविण्यासाठी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्षपद देऊ केले असून त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांचे समोर उभे आहे.या लढतीकडे कोपरगाव तालुकाच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून रहाणार आहे.त्यामुळे जसजशी निवडणुक जवळ येईल तसा या ग्रामपंचायत हद्दीत शिमगा रंगण्याची चिन्हे दिसणार आहे.



