जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

राष्ट्रवादीच्या वतीने विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

   दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती कार्यकर्ते.

“महाराष्ट्रात व देशांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने अतिशय मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत.
विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन निदर्शने करून केंद्र सरकारकडे न्याय मागत असताना सरकार मात्र कुठली दाद देत नाही ही बाब देशवासीयांना खटकली आहे” – सचिन मुजगुले,उपाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

   देशात पेपरफुटी प्रकरण,परीक्षांमधील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली आणि महाराष्ट्रासह देशभरात विद्यार्थी आंदोलने तीव्र झाली आहेत.दिल्लीत संसदेवर मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला,ज्याच्या निषेधार्थ कोपरगावसह महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद पाळण्यात आला आहे तर आज राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या नेतृत्त्वाखाली आज तहसील कार्यालयात येथे निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला आहे.

  महाराष्ट्रात व देशांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने अतिशय मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत.
विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन निदर्शने करून केंद्र सरकारकडे न्याय मागत असताना सरकार मात्र कुठली दाद देत नाही.उलट लहान विद्यार्थी व मुलींना देखील दिल्लीत पोलीसांनी अमानुष व आक्षेपार्य मारहाण केली आहे.

  या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होऊ नये व विद्यार्थ्यांना आपलं भविष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊ नये यासाठी आज विविध मागण्या घेऊन निवेदन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले,कोपरगाव तालुकाध्यक्ष बापू रांधवणे,तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव,जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे,तालुका युवक अध्यक्ष निखिल थोरात,शहर कार्याध्यक्ष रिंकू मगर,सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुराज काळे,तालुका उपाध्यक्ष शशिकांत सदाफळ,युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन पाचोरे,युवक तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गवळी,प्रशांत मेहेरखांब,सुरज औताडे,किरण भालेराव,किशोर जाधव सोमनाथ घारे,नंदकिशोर जाधव,ओंकार वढणे,माजिद पठाण,ज्ञानदेव जाधव,तेजस दिघे,ओम सरवार सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close