अपघात
रस्ता अपघातात महिला ठार,ग्रामस्थांत संताप!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर- लासलगाव महामार्गावरील कोळपेवाडी हद्दीतील ढोणे वस्ती येथे एका अद्न्यात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय महिला सुमनबाई कोळपे या ठार झाल्या आहे.या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान सदर महिलेला नजिकच्या ग्रामस्थानी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.या प्रकरणी महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले असून ते जवळच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.कोपरगाव-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग,झगडे फाटा-रांजणगाव देशमुख रस्ता (राज्य मार्ग ६५),आणि साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनचा ७ कोटींचा चौपदरी रस्ता अवघ्या काही वर्षांतच खचल्याने नागरिक त्रस्त आहेत.खड्डे,उडणारी धूळ व सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.सावळीविहीर लासलगाव रस्त्याचे कामाला गती येत नसल्याने व पर्यायी रस्ता ठीक नसल्याचे अपघातांची मालिका तालुक्यात सुरूच आहे.परिणामी तालुक्यातील कोट्यावधी रुपये खर्चून बनवलेले रस्ते काही महिन्यांतच उखडले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.खराब रस्ते आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालक व नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.महामार्गालगतची अतिक्रमणे आणि रस्त्यांची अपूर्ण कामे यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दळणवळण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरूस्ती व पुनर्बांधणी करणे आहे.मात्र याकडे सार्वजिक बांधकाम विभागाचे आणि राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी या मार्गांवर अपघातांची मोठी मालिका सुरू असून त्यात प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचे हकनाक बळी जात आहे.अशीच घटना काल कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर- लासलगाव महामार्गावरील कोळपेवाडी हद्दीतील ढोणे वस्ती नजिक काल सायंकाळच्या सुमारास घडली असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला शहाजापूर येथून आज पुणतांबा दिंडीत जाणार असल्याने त्या आपल्या जाऊबाईकडे विचारणा करण्यासाठी गेल्या होत्या.परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.आज दुपारी ०२ वाजता सुमनबाई कोळपे त्यांच्यावर कोळपेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात रस्त्याच्या कडेने घराकडे जात असलेल्या ५४ वर्षीय महिला सुमनबाई कोळपे यांना अज्ञात वाहनाने समोरून येत जोरदार धडक देऊन उडवले आहे.या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.मात्र उशिराने मिळालेल्या माहितीनुसार अपघात करणारी गाडी ही काळया काचा असलेली मारुती एर्टिगा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तो पुढे अनेक कॅमेऱ्यात टिपला गेला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान सदर महिलेला नजिकच्या ग्रामस्थानी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.या प्रकरणी महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले असून ते जवळच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.मात्र अद्याप या वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान,मयत सुमनबाई कोळपे या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेले काशिनाथ कोळपे यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन नातू,एक मुलगी असा परिवार आहे.
स्व.सुमनबाई कोळपे यांच्या आकस्मिक निधनाने कोळपेवाडी व ढोणे वस्ती परिसरावर शोककळा पसरली असून,त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान,अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



