अपघात
रस्ता अपघातात पुन्हा एक बळी,एक जखमी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अपघात थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.असाच एक अपघात आज धारणगाव येथे कोपरगाव -कोळपेवाडी मार्गावर युवराज रणशूर स्मारकाजवळ दोन दुचाकींची आमनेसामने धडक होऊन त्यात सिन्नर तालुक्यातील कोळगाव सांगवी येथील रहिवासी बाळासाहेब दामू घुमरे (वय -50) यांचा मृत्यू झाला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.तर अनिल जगन्नाथ खाजेकर (वय -48) यांच्या डोके पायाला गंभीर इजा झाली आहे.दरम्यान त्यांना पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यानजिकच्या सर्वच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील रस्ते चकचकीत झाले आहे.मात्र उत्तर नगर जिल्हा त्याला अपवाद मानला जात आहे.आता उत्तरेतील एका नेत्याच्या युवराजाने तर उतर नगर जिल्ह्यात होणारे अपघात ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे होत असल्याचा नवीन जावई शोध लावला असून नागरिकांना आता हसावे की रडावे अशी स्थिती ओढवली आहे.(नशीब पाकिस्तानमुळे अपघात वाढले असे आपले नेते अजून म्हणत नाही,आगामी काळात तो दिवस दूर नाही असे म्हणायला हरकत नाही) ग्रामीण भागातील रस्त्यांची वेगळी स्थिती नाही आपले अपयश झाकण्यासाठी नेते काही करण्यास तयार असल्याचे यावरून दिसून येत आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील सतत होणारे अपघात ही वर्तमानात खरोखरच अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे.हा रस्ता शिर्डी-शनी शिंगणापूर यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना जोडत असल्यामुळे येथे भाविक,विद्यार्थी आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते.मात्र,गेल्या अडीच दशकांपासून या मार्गाला ‘मृत्यूचा सापळा’ म्हटले जात आहे.या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून,रस्त्याचे काम अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते.याला कारण जसे भरधाव वेग आणि अनियंत्रित वाहतूकअसे असले तरी कंटेनर,डंपर आणि इतर अवजड वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवली जातात,ज्यामुळे लहान वाहनांना (कार आणि दुचाकी) भीषण धडका बसतात.या मार्गावर कोपरगाव नजीक असलेल्या साईबाबा कॉर्नर,पुणतांबा फाटा चौफुली,कोपरगाव बेट चौफुली,सावळीविहीर आदी ठिकाणे तर ब्लॅक स्पॉट बनली आहे.या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते.कोपरगाव तालुक्यानजिकच्या सर्वच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील रस्ते चकचकीत झाले आहे.मात्र उत्तर नगर जिल्हा त्याला अपवाद मानला जात आहे.
आता उत्तरेतील एका मंत्र्यांच्या युवराजाने तर उतर नगर जिल्ह्यात होणारे अपघात ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे होत असल्याचा नवीन जावई शोध लावला असून नागरिकांना आता हसावे की रडावे अशी स्थिती ओढवली आहे.(नशीब पाकिस्तानमुळे अपघात वाढले असे आपले नेते अजून म्हणत नाही,आगामी काळात तो दिवस दूर नाही असे म्हणायला हरकत नाही)

दरम्यान कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची वेगळी स्थिती नाही आपले अपयश झाकण्यासाठी नेते काही करण्यास तयार असल्याचे यावरून दिसून येत आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.मात्र त्यामुळे रस्ते अपघात कमी होणार नाही तर ते वाढत जाणार आहे.आज असाच एक दाहक अनुभव दुचाकीस्वारांना आला असून त्यांच्या दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील कोळगाव सांगवी येथील रहिवासी बाळासाहेब दामू घुमरे यांचा मृत्यू झाला आहे.ते शेतीच्या कामासाठी बियाणे घेऊन जात असताना त्यांच्या बजाज प्लॅटीना (क्र एम.एच.१५ इ .एन.२३३९)समोरून येणाऱ्या होंडा शाईन (क्र.एम.एच.१७-बी.जे.७२६६) दुचाकीवर अनिल खाजेकर याने धडक दिली असल्याचे मानले जात आहे.अनिल खाजेकर हे कोळपेवाडी येथून कोपरगावच्या दिशेने जात होते.या भीषण धडकेत बाळासाहेब घुमरे यांचा मृत्यू झाला आहे त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना मृत घोषित केले आहे.तर अनिल खाजेकर यांच्या डोके पायाला गंभीर इजा झाली आहे.त्यांना पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील छत्रपती संभाजी चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान कोपरगाव कोळपेवाडी हा रस्ता तसा फार वावगा नाही मात्र धारणगावच्या प्रवेश असलेल्या वळणावर गतिरोधक नसल्याने हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.बऱ्याच वेळा या मार्गावर वाळूचोरांचा हैदोस सुरू असल्याने त्यावर बारीक वाळू सांडलेले असते परिणामी रस्ता निसरडा होऊन तो अपघाताला निमंत्रण देत असतो याकडे कोण देणार अस गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.



