निधन वार्ता
भागीरथीबाई परजणे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर- (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ गृहिणी गं. भा.भागीरथीबाई जयवंतराव परजणे (वय-७८)यांचे शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान निधन झाले आहे. संवत्सर येथील अमरधामध्ये शनिवारी सकाळी त्यांच्यावर शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

स्व.भागीरथीबाई परजणे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी शेती व प्रपंच यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.गृहिणी म्हणून त्यांनी प्रपंच यशस्वी करून दाखवला होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.भागीरथीबाई परजणे या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्व.जयवंतराव भाऊराव परजणे यांच्या धर्मपत्नी होत्या.धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी शेती व प्रपंच यशस्वीपणे सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.गृहिणी म्हणून त्यांनी प्रपंच यशस्वी करून दाखवला.त्यांची दोन मुले विलास व नानासाहेब यांचे काही वर्षापूर्वीच निधन झालेले आहे.त्यांच्या पश्चात भाऊसाहेब परजणे व रावसाहेब परजणे ही दोन मुले.सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, खंडू फेपाळे,दिलीप ढेपले,सोमनाथ निरगुडे, चंद्रकांत लोखंडे,लक्ष्ममणराव परजणे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,बापू तिरमखे, बाळासाहेब दहे,शिवाजी गायकवाड यांच्यासह गोदावरी खोरे दूध संघ तसेच संजीवनी कारखान्याचे संचालक,पदाधिकारी,संवत्सर परिसरातील नातेवाईक,तसेच कार्यकते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.



