अपघात
महामार्गावर भीषण अपघात,दोन ठार!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर एका भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी ठरला असून डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही जागीच प्राण गेला आहे.ते दोघे कोपरगाव येथील असून ते त्यांची नावे आसिफ मोहम्मद शेख (वय-३२) आणि
सईफ रफिक शेख (वय १७)अशी आहेत.

अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढते अपघात ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक समस्या बनली आहे.खराब रस्ते,अपूर्ण कामे आणि प्रचंड वाहतूक यामुळे या मार्गावर नगर-मनमाड रस्त्याच्या अपघातांवर जनतेचा उद्रेक होत असतो तरीही त्याचा प्रशासनावर आणि राजकीय वावस्थेतेवर कवडीचा फरक पडत असल्याचे दिसत नाही.परिणामी दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.अशीच एक घटना येवला शहरात घडली आहे.त्यात कोपरगाव येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा बळी गेला आहे.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढते अपघात ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक समस्या बनली आहे.खराब रस्ते,अपूर्ण कामे आणि प्रचंड वाहतूक यामुळे या मार्गावर नगर-मनमाड रस्त्याच्या अपघातांवर जनतेचा उद्रेक होत असतो तरीही त्याचा प्रशासनावर आणि राजकीय वावस्थेतेवर कवडीचा फरक पडत असल्याचे दिसत नाही.परिणामी दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.अपघातांनंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून अनेक ठिकाणी प्रवासी आणि नागरिक फलक लावून निषेध नोंदवला जात आहे.सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते अहिल्यानगर पर्यंत अर्धनग्न आंदोलन करूनही प्रशासनाला काहीएक फरक पडला नाही हे विशेष !

येवला येथील अपघातात मयत आसिफ शेख आणि त्यांचा पुतण्या सैफ शेख हे दोघे लासलगाव,येवला,अंदरसुल,लोणी,कोपरगाव आदी ठिकाणी दर आठवड्याच्या बाजारात जाऊन आपला शेळ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असत.त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याची माहिती स्थानिकानी दिली आहे.आसिफ शेख यांचे पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यामुळे प्रशासन मोठे आणि नुकसानकारक आंदोलन होण्याची वाट पाहत असण्याची शक्यता वाढली आहे.रस्ते अपघाताची एक घटना आज सकाळी येवला शहरात घडली असून यात कोपरगाव येथील दोन व्यापाऱ्यांचा बळी गेला आहे.त्यांची नावे सईफ रफिक शेख (वय-१७),आसिफ मोहम्मद शेख (वय-३२) आणि सईफ रफिक शेख (वय १७), दोघे रा.संजयनगर कोपरगाव हे आपल्या एम.एच.-17 बी.डब्ल्यू.5864 क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर एम.एच.-12 एल.टी.-9980 क्रमांकाच्या डंपरने त्यांना चिरडले आहे.त्या घटनेत अपघात एवढा भीषण होता की,ते दोघे डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.कोपरगाव येथील दोन तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसर आणि कोपरगाव शहरात तीव्र शोककळा पसरली आहे.



