जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

  मोकाट जनावरांमुळे अपघातात वाढ,बंदोबस्त करण्याची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  
    
  कोपरगाव शहरातील विविध प्रमुख रस्ते,चौक तसेच रहदारीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या प्रश्नामुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर आज नगरपरिषदेचे आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात आगामी काही दिवसांत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे.

सर्व छायाचित्रे संकल्पित.

दरम्यान नुकत्याच झालेल्या एका अपघातात विकास अरुण डुंबरे हा एक तरूण गतप्राण झाला आहे तर एक सेवानिवृत शिक्षक दत्तू म्हातारबा कांबळे हे गंभीर जखमी झाले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तरीही प्रशासन गंभीर व्हायला तयार नाही.यापूर्वी अनेक वेळा या अपघातानंतर नगरपरिषद सक्रिय होते.मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जैसे थे स्थिती निर्माण होत आहे ही गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे.

    कोपरगाव शहरांमध्ये आणि रस्त्यांवर मोकाट जनावरांचा (गाई,म्हशी,कुत्रे,डुकरे आदी) वाढता उपद्रव हा वाहतूक सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर व चिंताजनक प्रश्न बनला आहे.यामुळे रस्ते अपघात,वाहतूक कोंडी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.जनावरांच्या कळपांमुळे शहरातील रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालक अपघातांना बळी पडतात.बऱ्याचदा मालक आपल्या जनावरांना मोकाट सोडतात, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.नियम मोडत सार्वजनिक रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्या मालकांवर पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते.स्थानिक प्रशासनाने व नागरी प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवणे गरजेचे असताना त्याकडे कानाडोळा केला जात आहे.विघ्नेश्वर चौक,छत्रपती संभाजी महाराज चौक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक,एस.जी.शाळा चौक,बसस्थानक परिसर आदी ठिकाणी हा मुक्काम असल्याचे वारंवार उघड झाले आहे.दरम्यान नुकत्याच झालेल्या एका अपघातात विकास अरुण डुंबरे हा एक तरूण गतप्राण झाला आहे तर एक सेवानिवृत शिक्षक दत्तू म्हातारबा कांबळे हे गंभीर जखमी झाले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.तरीही प्रशासन गंभीर व्हायला तयार नाही.यापूर्वी अनेक वेळा या अपघातानंतर नगरपरिषद सक्रिय होते.मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जैसे थे स्थिती निर्माण होत आहे.प्रशासनाने याबाबत मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगरपरिषदेने दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र,या कामासाठी कोणत्याही ठेकेदाराने निविदा दाखल केली नाही.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट जनावरे पकडण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे.

  

दरम्यान याबाबत कोपरगाव शहरातील गोरक्षक अमित जैन यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे कोकमठाण येथील गोशाळेची क्षमता संपली असून आता त्या ठिकाणी जाता उपलब्ध नाही.यावर कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी,”आपण नगरपरिषद हद्दीत लवकरच त्यांना 30 आर.क्षेत्र मंजूर करणार असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे जनतेला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

   दरम्यान शहरातील काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला चारा टाकला जातो.या चाऱ्याच्या लोभापोटी मोठ्या संख्येने जनावरे मुख्य रस्त्यांवर ठाण मांडून बसतात.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढतो.पादचारी,दुचाकीस्वार,वाहनचालक तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.असे रस्त्यावर चारा टाकणाऱ्या नागरिकांवर नाईलाजास्तव नगरपरिषदेला कायदेशीर कारवाई करावी लागेल याची नोंद संबंधित नागरिकांनी देखील घ्यावी असा इशारा आढाव यांनी दिला आहे.मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध प्राणीप्रेमी संस्था व सामाजिक संघटनांनाही आवाहन करण्यात आले होते.मात्र,अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

  दरम्यान कोपरगाव शहर आणि परिसरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.मोकाट जनावरांच्या धडकेत एका निरपराध नागरिकाचा मृत्यू झाला असून,११ ऑगस्ट रोजी झालेल्या अन्य एका अपघातात एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे.या दुर्घटनांना नगरपरिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे.त्यामुळे अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू किंवा जखमी झाल्याच्या घटनांमध्ये नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी केली आहे.

   दरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे.मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही,यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत असून काही दिवसांत हा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावला जाईल,असे वैभव आढाव यांनी सांगितले.तसेच नागरिकांनी रस्त्यावर जनावरांसाठी चारा टाकू नये,असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने त्यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close